तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा जागीच मृत्यू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पश्चिम भागात एका खेड्यात हा अपघात झाला आहे.

तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा जागीच मृत्यू

कॅमरून : मध्य आफ्रिकी देश कॅमरूनमध्ये (Cameroon) भीषण रस्ता अपघात झाला आहे. इथं बुधवारी एका बस आणि टँकरची धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या अपघातामध्ये 21 लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पश्चिम भागात एका खेड्यात हा अपघात झाला आहे. (bus accident 53 people killed in cameroon of bus and fuel tank accident)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. जोरात धडक झाल्यामुळे लगेच आग लागली. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, ’70 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला बेकायदेशीरपणे तेल घेऊन जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बसमध्ये बसलेल्या बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला तर बरेच जण गंभीर जखमी झाले. ‘

रात्री झाला अपघात

या अपघातामध्ये 20 पेक्षा जास्त लोक आगीत होरपळे असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याचं कारण शोधण्याचं काम पोलीस करत असून घटनास्थळी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (bus accident 53 people killed in cameroon of bus and fuel tank accident)

संबंधित बातम्या – 

भिवंडीच्या एमआयडीसी परिसरातील कंपनीला भीषण आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

दिल्लीमध्ये हडकंप माजवणारा दीप सिद्धू मोदी-शहांच्या गोटातला?; सामना अग्रलेखाद्वारे शिवसेनेचा आरोप

(bus accident 53 people killed in cameroon of bus and fuel tank accident)