केंद्राची आपत्तीग्रस्त राज्यांना 4381.88 कोटींची मदत, महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळासाठी केवळ 268 कोटी मंजूर

केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. Center approve fund for six states for natural calamities

केंद्राची आपत्तीग्रस्त राज्यांना 4381.88 कोटींची मदत, महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळासाठी  केवळ 268 कोटी मंजूर


नवी दिल्ली : केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील समितीनं सहा रांज्यासाठी हे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी 268.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई पोटी 1 हजार 65 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती. (Center approve fund for six states for natural calamities)

महाराष्ट्राला तुटपुंजी मदत

महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईसाठी 1 हजार 65 कोटी रुपये मागितले होते. मात्र, महाराषट्राला अवघे 268 कोटी 59 लाख मंजूर करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सहा राज्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबत, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम या राज्यांना देखील मदत करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला तटपुंजी मदत करण्यात आलीय.

पश्चिम बंगालला सर्वाधिक मदत

‘अम्फान’ वादळाचा सामना करणाऱ्या पश्चिम बंगालला सर्वाधिक मदत जाहीर करण्यात आली आहे. 4381.88 पैकी 2707.77 कोटी रुपये पश्चिम बंगालला देण्यात आले आहेत. अम्फान वादळासाठी बंगालला यापूर्वी 1 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून 4381.88 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांना करण्यात येत आहे, असं सांगितले आहे. अम्फानसाठी बंगालला 2707.77 कोटी, महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळासाठी 268.59 कोटी, मान्सून पावसादरम्यान पूर आणि भूस्खलनासाठी कर्नाटकला 577.84 कोटी, सिक्कीमला 87.84 आणि मध्यप्रदेशला 611.61 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

दरम्यान, अम्फान चक्रीवादळासाठी बंगालला यापूर्वी 1 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा जाहीर झालेल्या मदतीमध्ये 2707.77 रुपये जाहीर झाली आहे. या मदतीला आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.

राज्य निहाय मदतीची रक्कम

महाराष्ट्र : 268 कोटी 59 लाख
पश्चिम बंगाल: 2,707.77 कोटी
कर्नाटक : 577.84 कोटी
मध्य प्रदेश : 611.61 कोटी
सिक्कीम : 87.84 कोटी

संबंधित बातम्या :

‘निसर्ग चक्रीवादळाचा फटका, रायगडला विशेष आर्थिक पॅकेज द्या’, अदिती तटकरे मागणी करणार

Breaking News | निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी शिवसेनेची हेल्पलाईन

(Center approve fund for six states for natural calamities)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI