सामान्य नागरिक म्हणून चंद्रकांत पाटलांची राज ठाकरेंकडून अपेक्षा

जळगाव: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, शिवाय भाजपच्या जळगावातील राड्याबाबतही भाष्य केलं. अमळनेर इथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या हाणामारीची दखल घेऊन चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. अमळनेर इथे भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भाजपचे माजी आमदार […]

सामान्य नागरिक म्हणून चंद्रकांत पाटलांची राज ठाकरेंकडून अपेक्षा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

जळगाव: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, शिवाय भाजपच्या जळगावातील राड्याबाबतही भाष्य केलं. अमळनेर इथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या हाणामारीची दखल घेऊन चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितले.

अमळनेर इथे भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांना जाहीर मेळाव्यात मारहाण केली होती. हे प्रकरण राज्यासह दिल्लीत देखील गाजले. या   यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

“अमळनेर इथे ज्या पद्धतीने घटना घडली ती चुकीची  आहे, त्या घटनेचं समर्थन होऊ शकत नाही. वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्व प्रकरण गेले आहे. सर्व प्रकरणाची शहानिशा करुन यासंदर्भात कारवाई होईल”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज ठाकरेंबद्दल प्रतिक्रिया

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंच्या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे हे आपल्या महाराष्ट्राचे प्रगल्भ आणि हुशार नेते आहेत. त्यांनी या लोकसभेच्या रिंगणात आपले काही उमेदवार उभे करुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करायला हवा होता. परंतु ज्या काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली, त्या पक्षांचा ते आता प्रचार करत आहेत. त्यांनी दोन्ही पक्षांची योग्य ती भूमिका मांडावी अशी एक सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज ठाकरेंचा हल्लाबोल, टीव्ही 9 मराठीचा रिपोर्ट दाखवला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात सुरु आहे. नांदेडनंतर त्यांनी सोलापूरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारच्या डिजीटल इंडिया योजनेचा कसा बोजवारा उडालाय, याबाबतचंही चित्र दाखवलं. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे देशातलं पहिलं डिजीटल गाव म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. पण या गावात सध्या काय परिस्थिती आहे हा ग्राऊंड रिपोर्ट टीव्ही 9 मराठीने केला होता. या रिपोर्ट राज ठाकरेंनी भरसभेत दाखवून सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली.

राज ठाकरेंनी त्यांच्या अगोदरच्या सभेत हरिसाल गावात काय परिस्थिती आहे, डिजीटल गावात इंटरनेटही नाही याबाबतचं वास्तव दाखवलं होतं. मनसे नेते संदीप देशपांडे आणि त्यांच्या टीमने गावाला भेट दिली होती. यानंतर टीव्ही 9 मराठीने या गावाचा आढावा घेतला आणि त्यानंतर एनकाऊंटर या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्नही विचारला होता. पण राज ठाकरेंनी दाखवलेली परिस्थिती जुनी आहे, आजचं चित्र तुम्ही जाऊन पाहा, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आम्ही हे चित्र जाऊन पाहिल्यानंतर वास्तव समोर आलं.

संबंधित बातम्या 

राज ठाकरेंनी भरसभेत टीव्ही 9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवला   

‘लाथा-बुक्के मेळावा’ भाजपच्या अंगलट येईल?  

जळगावात नेमकं काय घडलं, ज्यामुळे संकटमोचक स्वतःच संकटात आले  

गिरीश महाजन यांच्यासमोर माजी आमदाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.