Mission Chandrayaan 2 : देशातील दिग्गजांकडूनही इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक

शेवटच्या क्षणी चंद्रयान 2 (Chandrayaan 2) विक्रम लँडरचा भारतासोबत संपर्क तुटला. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञांमध्ये तसेच देशातील नागरिक निराश झाले आहेत.

Mission Chandrayaan 2 : देशातील दिग्गजांकडूनही इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक

नवी दिल्ली : शेवटच्या क्षणी चंद्रयान 2 (Chandrayaan 2) विक्रम लँडरचा भारतासोबत संपर्क तुटला. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये निराशा आहे. पण देशभरातून प्रत्येक नागरीक तसेच दिग्गज मंडळींनी इस्रोचं (ISRO) कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींनीही शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी थेट इस्रोमध्ये जाऊन भेट दिली.

चंद्रयान 2 मोहीमेच्या टीमने खूप छान काम केलं. देशाला इस्रोवर अभिमान आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहे, तुम्ही पुढेही चांगलं काम कराल अशी अपेक्षा करतो, असं ट्वीट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं.

भारताला आपल्या शास्त्रज्ञांवर अभिमान आहे. ते नेहमीच देशासाठी अभिमानास्पद आणि उत्कृष्ट कामगिरी करतात. धीर सोडू नका आम्ही तुमच्यासोबत आहे. आपण पुन्हा कठोर परिश्रम घेऊ आणि हा कार्यक्रम यशस्वी करु, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही इस्रोचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक भारतीयांसाठी तुमचे काम आणि मेहनत ही सर्वांसाठी एक प्रेरणादायी ठरेल. तुमचे परिश्रम वाया गेले नाही. तुमची ही कामगिरी भविष्यातील इतर मोहीमेसाठी मार्गदर्शक ठरेल, असं राहुल गांधी ट्वीट करत म्हणाले.

इस्रोला शुभेच्छा देत केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, आपल्या शास्त्रज्ञांना खूप शुभेच्छा, तुमच्या कार्यावर आम्हाला अभिमान आहे. भारत तुम्हाला सलाम करतो.

आम्ही तुमच्यासोबत आहे. तुमच्या चंद्रयान 2 मोहीमेमुळे अंतराळात आपली एक ओळख निर्माण झाली. तुमच्या या कार्यामुळे देश, तरुण आणि सर्वजण एकत्र आले आहेत. तुम्हाला नक्की यश मिळेल, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ट्वीट करत म्हटले.

चंद्रयान 2 मोहीमेवर प्रत्येक भारतीय अभिमान करत आहे. भारत आपल्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांच्यासोबत आहे. भविष्याच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

आम्हाला आमच्या वैज्ञानिकांवर अभिमान आहे. त्यांनी इतिहास रचला आहे. निराश होण्याची गरज नाही. आपल्या वैज्ञानिकांनी मोठं काम केलं आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI