सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना, सहावीतील मुलीवर जबरदस्ती, मोबाईलवर अश्लील फोटो काढले

संचारबंदीत सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. बेडग येथे एका सहावीतील मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी लैंगिक अत्याचाराची घटना, सहावीतील मुलीवर जबरदस्ती, मोबाईलवर अश्लील फोटो काढले

सांगली : संचारबंदीत सलग दुसऱ्या दिवशी सांगली (Child Molestation In Sangli) जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचा आरोप आहे. बेडग येथे एका सहावीतील मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन मोबाईलवर तिचे अश्लिल फोटो काढल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लक्ष्मण कारंडे (वय 25) नावाच्या नराधमास अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात (Child Molestation In Sangli) एकच खळबळ उडाली आहे.

मिरज तालुक्यातील बेडग गावात एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या चुलती कडे आली होती. लॉकडाऊन असल्याने ती बेडगमध्येच अडकून पडली. रात्री लघुशंकेसाठी ती घराबाहेर आली. त्यावेळी लक्ष्मण कारंडे नावाच्या व्यक्तीने तिला जबरदस्ती बेडगमधील अंगणवाडी शाळेच्या बाथरुम नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे लैंगिक शोषण करुन या नराधमाने मोबाईलवर तिचे अश्लिल फोटोही काढले, असा आरोप आहे (Child Molestation In Sangli).

या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण कारंडे याला अटक करुन त्याविरोधात लैंगिक शोषण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तपासणीनंतरच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, संचारबंदीत सलग दुसऱ्या अत्याचार झाल्याची तक्रार आल्याने शहरात खळबळ (Child Molestation In Sangli) उडाली आहे.

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार 

मिरजेत काल एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना पुढे आली होती. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या तरुणीवर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बलात्कार झाल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडित तरुणीला जबरदस्ती दारु पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे. मिरज रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास 19 वर्षीय तरुणीवर दोन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्कार प्रकरणी सांगलीतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजू अच्युदन आणि अक्षय कणशेट्टी या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सांगलीत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे.

संबंधित बातम्या :

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार

मुंबईत लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात गोळीबार, दोघांना अटक

Lockdown : दारुबंदी असलेल्या वर्ध्यात नदीपात्रात दारुनिर्मिती, 7 लाखांचे दारुचे साहित्य नष्ट

ग्रामविकास विभागात 28 हजार जागांच्या नोकरभरतीची खोटी जाहिरात, पुण्यात बोगस वेबसाईटवर गुन्हा

Published On - 4:10 pm, Fri, 24 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI