AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडेतीन महिन्यांपूर्वी आम्ही महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशांत दामले यांच्या कार्यक्रमात तुफ्फान फटकेबाजी

साडेतीन महिन्यांपूर्वी आम्ही महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2022 | 9:53 AM
Share

मुंबईः  प्रशांत दामले (Prashant Damle) हे नाट्य क्षेत्रात ग्रेट आहेत, पण साडेतीन महिन्यांपूर्वी आम्हीही एक महानाट्य केलं. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacketay) यांना अशा प्रकारे टोला लगावला. ते म्हणाले, ‘  12,500  वा प्रयोग झाला तुमचा. मी तीन साडेतीन महिन्यांपूर्वी महानाट्य केलं. त्याचे पडसाद आजही उमटतात. राज्यात, देशात, जगभरात उमटतात. तुमच्यासारखं आम्ही केलंच नं हे…. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

यापूर्वीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत-पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आज भारताने विजय मिळवला, तसा सामना आम्ही तीन महिन्यांपूर्वीच जिंकला होता, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.

रविवारी प्रशांत दामले यांच्या एका नाटकाचे 12,500 प्रयोग झाले. यानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात रविवारी मुख्यमंत्री बोलत होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. नेत्यांनी यावेळी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली.

राज ठाकरे यांनी यावेळी वक्तव्य केलं, मी,फडणवीस आणि सीएम एकत्र बघून लोकांना वाटेल एकावर एक फ्री आहे का… कारण यापूर्वी आमच्या (मनसेच्या) दीपोत्सवाला आम्ही तिघे एकत्र आलो होतो. लोकांना वाटणार हे आले म्हणजे ते येणार, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात प्रशांत दामले यांच्या अभिनयाचे कौतुक केले. ते म्हणाले, मी जेव्हा लोकांमध्ये जातो. तेव्हा सांगतो, मी तुमच्यातलाच आहे. साडेतीन हजार लोक होते, त्यामुळे त्यांना मी भेटत भेटत आलो.

लोक मला विचारतात, एवढी एनर्जी, क्षमता तुमच्यात कुठून येते. पण प्रशांत दामले… तुमच्यातही एवढी ऊर्जा कशी येते?

रंगमंचावर कलावंत जेव्हा आपली कलाकृती सादर करतो, कलेचा आविष्कार घडवतो, त्यावेळी समोरच्या रसिकांनी दाद दिली तरच कला वृद्धिंगत होते. तसेच आमचेही आहे…

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचीही स्तुती केली.

प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.