AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक दिवस असा दिवस येईल की जनता म्हणेल, कोणीही चालेल पण हे नको, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

मोदी सरकारला पर्याय कोण असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. मात्र एक दिवस असा येईल की लोक म्हणतील कुणीही चालेल पण हे नको, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ठाकरी तोफ डागली.

एक दिवस असा दिवस येईल की जनता म्हणेल, कोणीही चालेल पण हे नको, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
| Updated on: Oct 25, 2020 | 9:35 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या काळात देशात किळसवाणं प्रकारचं राजकारण सुरु आहे. त्यांना (मोदी सरकारला) पर्याय कोण असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. मात्र एक दिवस असा येईल की लोक म्हणतील कुणीही चालेल पण हे नको, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ठाकरी तोफ डागली. (Cm Uddhav Thackeray Attacked Pm Modi Government)

महाराष्ट्र भाजप, केंद्र सरकार, महाविकास आघाडी, जीएसटी, बिहार विधानसभा निवडणूक, चीनची आगळीक, कंगना रनौत आदी विषयांवर उद्धव ठाकरे यांनी आपली सडेतोड मतं व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केले. भेदभाव करून सरकार चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. कोरोना लस बिहारला फुकट मग आम्ही काय बांगलादेशला राहतो काय?, असा सवाल त्यांनी विचारला. भाजपचं देशात किळसवाणं राजकारण सुरु आहे. पण लोक अशा राजकारणाला एक दिवस कंटाळतील आणि कुणीही चालतील पण हे नको असं म्हणतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जीएसटीच्या मुद्द्यावरुन रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. दावनेंच्या टीकेची मुख्यमंत्र्यांनी व्याजासकट परतफेड केली. माझा बाप केंद्रात नाही. तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो. माझा बाप महाराष्ट्राच हाच आहे, माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्त्व तुम्हाला दिसून येईल, अशा शब्दात त्यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलं.

घंटी वाजवा, थाळ्या बडवा हे आमचं हिंदुत्व नाही. अतिरेक्यांना बडवणारा हिंदु बाळासाहेबांना अपेक्षित होता. आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकलेलो आहोत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं.

दुसरीकडे बिहारच्या निवडणुकीवर भाष्य न करता बिहारवासियांनी डोळे उघडे ठेऊन मतदान करावं. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावं. मी कुणाला मतदान करायचं अथवा करु नका हे सांगणार नाही. पण एवढंच सांगेन डोळे उघडे ठेऊन मतदान करा, असं उद्धव म्हणाले.

जीएसटीच्या मुद्द्यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावलं. जर जीएसटीची प्रणाली अपयशी ठरली असेल तर पहिल्या करणप्रणाली नुसार अंमलबजावणी व्हावी, असं सांगतानाच पंतप्रधान मोदींनी याबद्दल माफी मागितली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात भाजपवर जोरदार प्रहार केले. राज्यातील भाजप नेते आणि केंद्रीय नेतृत्वाला देखील उद्धव ठाकरेंनी सुनावलं.  (Cm Uddhav Thackeray Attacked Pm Modi Government)

संबंधित बातम्या

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

CM Uddhav Thackeray Speech | कळसूत्री बाहुल्यांचा खेळ संपवला, यापुढे राज्यात मर्द मावळ्यांचं सरकार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.