PHOTO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बांधावर, नुकसानीच्या पाहणीसह शेतकऱ्यांना धीर
नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौरा करत आहेत. (CM Uddhav Thackeray Solapur Visit Photos)

- नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौरा करत आहेत.
- उद्धव ठाकरे सकाळी 9.30 च्या सुमारास सोलापुरात दाखल झाले. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित आहेत.
- उद्धव ठाकरेंनी सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौरा केला.
- यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
- तसेच अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
- यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
- यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 11 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही करण्यात आले.
- मदतीसाठी माहिती गोळा करतोय, अभ्यास करत बसणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
- कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही गरज पडल्यास केंद्राला मदत मागू, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले
- संकटांचे डोंगर नक्की पार करु, शेतकऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले
- पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर म्हणजे दुपारी सुमारे 2 च्या दरम्यान मुख्यमंत्री प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.











