गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार मदतीची मागणी, आता मुख्यमंत्री आहात, तातडीने मदत करा : राजू शेट्टी

"पूर चक्रीवादळ आणि आता ओला दुष्काळ यासारख्या संकटातून शेतकरी जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून त्यांना लगोलग मदत करावी", असं राजू शेट्टी म्हणाले.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार मदतीची मागणी, आता मुख्यमंत्री आहात, तातडीने मदत करा : राजू शेट्टी

इचलकरंजी : “गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारने पंचवीस हजार रुपये हेक्‍टरी मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते. मात्र आता ते मुख्यमंत्रीपदावर आहेत. आता पंचनामे बाजूला ठेऊन त्यांनी मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्यावा तसंच भरीव आर्थिक मदत द्यावी”, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले. (Cm Uddhav thackeray Should help Farmer Says Raju Shetti)

“परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. पूर चक्रीवादळ आणि आता ओला दुष्काळ यासारख्या संकटातून शेतकरी जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून त्यांना लगोलग मदत करावी”, असं राजू शेट्टी म्हणाले.

“गेल्या 3 ते 4 दिवसांत पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्याला आता सरकारच्या मदतीची गरज आहे. अशावेळी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन बळीराजाला तातडीने मदत देऊन आधार द्यावा”, असं ते म्हणाले.

दुसरीकडे राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. “केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीशी झुंझत असताना केंद्र सरकार मात्र त्यांची जबाबदारी झटकत आहे”, अशी टीका शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केली.

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल 44 जणांनी गमावला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टीदरम्यान पुणे विभागात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरु आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला.

(Cm Uddhav thackeray Should help Farmer Says Raju Shetti)

संबंधित बातम्या

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जवळपास निश्चित; राजू शेट्टींना दिलेलं वचनही पाळणार

दगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा

Published On - 11:27 pm, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI