राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येणार : अमित देशमुख

या दुर्घटनाग्रस्तांना आणखी मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असेही अमित देशमुख यांनी सांगितले. (Amit deshmukh Comment On Hospital Safety Audit)

राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येणार : अमित देशमुख

मुंबई : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला मध्यरात्री अचानक आग लागली.  या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या सेफ्टी ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. (Amit deshmukh Comment On Hospital Safety Audit)

राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील सेफ्टी ॲाडिट करण्यात येणार आहे. या सेफ्टी ॲाडिटसाठी एखादी टीम नेमली जाणार आहे. यासाठी सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले.

त्याशिवाय राज्यातील मेडीकल कॅालेजमध्ये असलेल्या रुग्णालयाचं सेफ्टी ॲाडीट होणार आहे. तसेच या दुर्घटनाग्रस्तांना आणखी मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

भंडाऱ्यातील दुर्घटना क्लेशदायक : किशोरी पेडणेकर

दिल्लीत अशाप्रकारची घटना घडल्यानंतर मुंबईतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे यापूर्वीच आदेश दिले आहे, मात्र भंडाऱ्यातील दुर्घटना पाहिल्यानंतर हृदय पिळवटलं आहे. ही घटना दुखजनक आणि क्लेशदायक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईतील फायर सेक्शनने नव्हे तर रुग्णालयातील डीन, एचओडी आणि कर्मचाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

ही घटना अप्रिय आहे. मी सक्त ताकीद देऊन ही घटना परत कुठे घडू नये. मुंबईत तर नाहीच नाही, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

नेमकं प्रकरणं काय? 

भंडारा इथं सरकारी रुग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव झालं. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे.

ही आग पसरु नये तसेच आगीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या ही आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. (Amit deshmukh Comment On Hospital Safety Audit)

संबंधित बातम्या : 

भंडारा दुर्घटनेत भाजपची मागणी भाई जगताप यांनाही मान्य, म्हणाले…

Bhandara Fire : घरी जाऊन मातांचं सांत्वन, उद्याच्या उद्या 5 लाख, दोषींना सोडणार नाही : राजेश टोपे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI