नवरा-नवरीला कोरोना, एका लग्नामुळे 7 ठिकाणी कंटेन्मेंट झोन, नवरदेवाला 25 हजाराचा दंड

पिपरी मेघे येथे झालेला लग्न सोहळा प्रशासनाच्या डोकेदुखी ठरला आहे (Action against Groom in Wardha). या लग्नातील नवरदेव, नवरीसह सात जणांना कोरोनाची लागण झाली.

नवरा-नवरीला कोरोना, एका लग्नामुळे 7 ठिकाणी कंटेन्मेंट झोन, नवरदेवाला 25 हजाराचा दंड

वर्धा : पिपरी मेघे येथे झालेला लग्न सोहळा प्रशासनाच्या डोकेदुखी ठरला आहे (Action against Groom in Wardha). या लग्नातील नवरदेव, नवरीसह सात जणांना कोरोनाची लागण झाली. या एका लग्नामुळे सात ठिकाणी कंटेन्मेंट झोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या लग्नाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. याशिवाय आता वर्ध्यात लग्न समारंभासाठी फक्त 20 नातेवाईकांना सहभागी होता येणार आहे (Action against Groom in Wardha).

पिपरी येथील लग्न सोहळ्याप्रकरणी प्रशासनाकडून नवरदेवाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नवरदेवाने लग्नाआधी कुठलीही परवानगी न घेता कंदुरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय कंदुरीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतरांचा प्रशासनाकडून शोध सुरु आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पिपरी येथील एका लग्नामुळे वर्ध्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी तातडीने लग्न सोहळ्याबाबत नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार लग्नात आता 20 पेक्षा जास्त नातेवाईक सहभागी झाल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नव्या नियमावलीत काय आहे?

  • लग्नात सहभागी झालेल्या प्रत्येक नातेवाईकाला 14 दिवस विलगीकरणात राहणे अनिवार्य राहील.
  • दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना लग्न सोहळ्यात सहभागी होता येणार नाही (अपवाद फक्त वर किंवा वधु आणि त्यांच्यासोबत 4 व्यक्ती ).
  • विवाह सोहळ्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्ती उपस्थित राहिल्यास आयोजकांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. याशिवाय आयोजकांकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल.
  • विवाहस्थळी संबंधित तहसीलदार एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करतील. तसेच तहसीलदारमार्फत परवानगी प्राप्त यादी व्यतिरिक्त अन्य कोणी व्यक्ती उपस्थित राहील्यास, अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

संबंधित बातम्या : 

वर्ध्यात नवरदेवाला कोरोना, वऱ्हाडी अमरावतीला परतले, क्वारंटाईनसाठी प्रशासनाची वरात

पिपरीच्या लग्नाने प्रशासन त्रस्त, नवरी, नवरदेवाची आई आणि दोन वऱ्हाड्यांना संसर्ग

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI