Wardha Corona | पिपरीच्या लग्नाने प्रशासन त्रस्त, नवरी, नवरदेवाची आई आणि दोन वऱ्हाड्यांना संसर्ग

कोरोना चाचणी अहवालात या लग्न समारंभातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

Wardha Corona | पिपरीच्या लग्नाने प्रशासन त्रस्त, नवरी, नवरदेवाची आई आणि दोन वऱ्हाड्यांना संसर्ग

वर्धा : पिपरी मेघे येथे झालेल्या लग्न सोहळ्याने प्रशासनाची (Wardha Wedding Corona Update) झोप उडविली आहे. या लग्नातील नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्याने अख्ख वऱ्हाड कोरोना पॉझिटिव्ह येते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. आज (10 जुलै) आलेल्या कोरोना चाचणी अहवालात या लग्न समारंभातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये नवरदेवाची आई, नवरी आणि या लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी दोन वऱ्हाड्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला धडकी भरली आहे (Wardha Wedding Corona Update).

या लग्नाला उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांचा शोध पोलीस घेत आहेत. जे वऱ्हाडी सापडले त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाबाधित नवरदेवाची आई, नवरीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे. या दोघींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु असताना दुपारी या लग्नात गेलेल्या दोघांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले. त्यांचा आणखी कोणाशी संपर्क आला आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

वर्धा शहरासह आजूबाजूच्या नऊ ग्रामपंचायतीत 3 दिवसांची संचारबंदी

शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून यावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना म्हणून वर्धा शहरासह आजूबाजूच्या पिपरी (मेघे), साटोडा, नालवाडी, सावंगी (मेघे), उमरी (मेघे), बोरगाव, म्हसाळा, नटाळा आणि सदी (मेघे) ग्रामपंचायत परिसरात शुक्रवार (10 जुलै) रात्रीपासून सोमवारपर्यंत (13 जुलै) लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात केवळ वैद्यकीय सेवा आणि औषधींची दुकानं सुरु राहणार आहेत (Wardha Wedding Corona Update).

वर्ध्यात नवरदेवाला कोरोना, वऱ्हाडींना क्वारंटाईन करण्याचं प्रशासनासमोर आव्हान

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त नातेवाईकांना परवानगी नसतानाही वर्ध्यात प्रचंड गर्दीत एक विवाह सोहळा पार पडला होता. पिपरी मेघे येथे 30 जून रोजी हा विवाह समारंभ पार पडला. या लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांनीच नवरदेवला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या लग्नात सहभागी झालेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणं, हे प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. तसेच, प्रशासन या लग्नातील वऱ्हाड्यांना शोधून त्यांची कोरोना चाचणी करत आहे.

Wardha Wedding Corona Update

संबंधित बातम्या :

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

नवरदेव पीपीई किट घालून बोहल्यावर, नवरीच्या डोक्यावर प्लास्टिक हेल्मेट, अनोखा विवाह सोहळा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *