कोरोना होऊन गेल्यानंतर अन्य आजार लवकर होत नाहीत, संशोधकांचा दावा

कोरोना अँटीबॉडी इतर आजारांनाही रोखण्यात सक्षम असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे (Corona Antibodies new research).

कोरोना होऊन गेल्यानंतर अन्य आजार लवकर होत नाहीत, संशोधकांचा दावा

वॉशिंग्टन : कोरोनावर नियंत्रण करणाऱ्या रोगप्रतिकार शक्तींवर केलेल्या एका नव्या संशोधनात महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. जे लोक कोरोना होऊन बरे झाले आहेत, त्यांच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती (कोरोना अँटीबॉडी) इतर आजारांनाही रोखण्यात सक्षम असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे (Corona Antibodies new research). कोरोनाविरुद्ध शरीरात तयार झालेली ही रोग प्रतिकार शक्ती इतर विषाणूंना शरीरात येण्यापासून रोखते. हे संशोधन अमेरिकेत करण्यात आलं आहे.

अमेरिकेतील सिएटलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या तिघांना या आजाराचा सर्वाधिक प्रकोप होत असलेल्या ठिकाणी एका मासेमारी करणाऱ्या जहाजावर क्वारंटाईन करण्यात आलं. त्यांचा अभ्यास केल्यानंतर या तिघांच्या शरीरातील अँटीबॉडीज (Antibodies) दुसऱ्या रोगांच्या संसर्गाला देखील रोखण्यास सक्षण असल्याचं समोर आलं. हे संशोधन अँटीबॉडी आणि व्हायरल डिटेक्शन टेस्टवर आधारित आहे. त्याच्या निष्कर्षातून हा दावा करण्यात येत आहे.

एचटीने दिलेल्या वृत्तानुसार या अभ्यासाचे निष्कर्ष अँटीबॉडीसोबतच (Serological) व्हायरल डिटेक्शनवर (रिव्हर्स ट्रांसक्रिपटेस-पोलीमरेज चेन रिअॅक्शन किंवा आरटी-पीसीआरवर) आधारित आहेत. जहाज जाण्याआधी आणि जाऊन आल्यावर त्यातील प्रवाशांच्या बारकाईने तपासण्या करण्यात आल्या. समुद्रामध्ये 18 दिवसांच्या प्रवासावर असलेल्या जहाजावर चालक दलातील 122 सदस्यांपैकी 104 जण एकाच प्रकारे विषाणूच्या संपर्कात आले होते.

वॉशिंग्टन विद्यापीठातील मेडिसिन क्लिनिकल व्हायरोलॉजी लॅबोरेटरीचे सहसंचालक आणि या अभ्यासातील संशोधक अलेक्जेंडर ग्रेनिंजर म्हणाले, “या संशोधनावरुन हे स्पष्ट होत आहे की अँटीबॉडी, सार्स आणि कोव्हिडमध्ये परस्पर संबंध आहे. अँटीबॉडी असणाऱ्यांची संख्या खूप कमी असल्याने याची व्याप्ती वाढवण्याचीही गरज आहे. यावर अधिक सखोल संशोधन व्हायला हवं.

हा अभ्यास अहवाल शुक्रवारी (13 ऑगस्ट) प्रीप्रिंट सर्वर मेडरिक्स आणि सिएटलच्या फ्रेंड हच कँसर रिसर्च सेंटरवर पोस्ट करण्यात आला होता. या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष महत्वाचा मानला जात आहे. कारण संपूर्ण जाग सध्या साथीरोगावर नियंत्रणासाठी केवळ लसीकडे पाहत आहे. मात्र, या आजाराला रोखण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकार शक्ती (अँटीबॉडी) पुरेशा असल्याचं समोर येत असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्तीवर अधिक संशोधन होण्याची गरज तयार झाली आहे. या संशोधनकांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे, “एकूण 104 व्यक्तींची RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आली. जहाजावर 85.2 टक्के संसर्गाचा धोका वाढला.

हेही वाचा :

शरद पवारांच्या ताफ्यातील तीन सुरक्षारक्षक, सिल्व्हर ओकमधील दोन कर्मचारी कोरोनाग्रस्त

कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांचा नकार, मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला

मुंबईत 20 वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी, कुठे काय स्थिती?

Corona Antibodies new research

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI