Corona : मध्य प्रदेशात BSF जवानाला कोरोनाची लागण, 50 जवानांना क्वारंटाईन

मध्य प्रदेशात एका बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर (Corona infected BSF soldier) आलं आहे.

Corona : मध्य प्रदेशात BSF जवानाला कोरोनाची लागण, 50 जवानांना क्वारंटाईन


भोपाळ : मध्य प्रदेशात एका बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर (Corona infected BSF soldier) आलं आहे. जवानाला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लागण झालेल्या जवानासोबत असलेल्या 50 इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या बीएसएफमधील डॉक्टरांच्या निगराणीखाली जवानांवर उपचार (Corona infected BSF soldier) सुरु आहेत.

मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यात टेकनपूर येथे बीएसएफ जवानांचे आधुनिक ट्रेनिंग सेंटर आहे. या सेंटरमधील एका अधिकाऱ्याची तपासणी केली असता त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

कोरोनाची लागण झालेल्या जवानाची पत्नी नुकतेच लंडनवरुन भारतात परतली होती. त्यामुळे पत्नीद्वारे या जवानाला कोरोनाची लागण झाली असावी, असं सांगितले जात आहे.

CISF जवानाला कोरोनाची लागण

सीआयएसएफच्याही एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. हा जवान मुंबईतील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर तैनात होता. त्याला त्याच्या ड्युटी दरम्यान कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

भारतात एक हजारा कोरोना रुग्ण

देशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशा आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाची लागण अधिकांना होऊ नये यासाठी मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली.

दरम्यान, मध्य प्रदेशात आतापर्यंत एकूण 34 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मध्य प्रदेशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे इंदौरमध्ये सापडले आहेत. तर कोरोनामुळे मध्य प्रदेशात एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI