लातूरमध्ये एकाच कुटुंबातील 10 तर नगरमध्ये एकाच घरात 5 जणांना कोरोना

लातूरमध्ये एकाच कुटुंबातल्या 10 जणांना आणि अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Corona infection to Family members ).

लातूरमध्ये एकाच कुटुंबातील 10 तर नगरमध्ये एकाच घरात 5 जणांना कोरोना
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 6:44 PM

मुंबई : कोरोनाच्या विषाणूने कुटुंब स्तरावर संसर्ग करण्यास सुरुवात केल्याची दोन मोठी उदाहरणं समोर आली आहेत. लातूरमध्ये एकाच कुटुंबातल्या 10 जणांना आणि अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Corona infection to Family members ). त्यामुळे लातूर आणि अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या लातूरमधील कोरोना रुग्णांचा आकडा 129 वर, तर अहमदनगरमधील आकडा 124 वर पोहचली आहे.

लातूरमध्ये आडत व्यापाऱ्याच्या घरात व्यापाऱ्यासह 10 जणांना कोरोना झाला. सुरुवातीला संबंधित आडत व्यापाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या. यात इतर सदस्य देखील कोरोना बाधित असल्याचं समोर आलं. यानंतर लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता 129 वर गेली आहे. लातूरमध्ये आतापर्यंत 61 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर एकूण 66 जण उपचार घेत आहेत.

अहमदनगर शहरातही एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यात 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. याच कुटुंबातील एक महिला पुण्यात कोरोनाबाधित आढळली आहे. दुसरीकडे संगमनेर येथील एका खासगी प्रयोगशाळेतही 2 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासह अहमदनगरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 124 झाली आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील आणखी 6 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. यात अहमदनगर शहरातील 3, पाथर्डी आणि संगमनेर येथील प्रत्येकी 1 आणि संगमनेर येथीलच मात्र सध्या नाशिक येथे उपचार घेत असलेला एक रुग्ण यांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 68 इतकी झाली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विळखा, 33 पोलीस, तर पालिकेतील 60 कर्मचाऱ्यांना लागण

वरळी पॅटर्न वगैरे काही नाही, सरकारने बनवाबनवी थांबवावी : देवेंद्र फडणवीस

कोरोनावर उपचार घेऊन घरी, रहिवाशांकडून टाळ्या वाजवून स्वागत, अवघ्या चार तासात पोलिसाचं निधन

जुळ्या बाळांना जन्म देऊन कोरोनाबाधित मातेचं निधन, बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा

संबंधित व्हिडीओ :

Corona infection to Family members

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.