Nepal PM Corona | नेपाळचे पंतप्रधान के पी ओलींना कोरोना, सुरक्षेसाठी तैनात 76 जवानही बाधित

जगभरात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरुच आहे. आता नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona infection to Nepal PM KP Oli).

Nepal PM Corona | नेपाळचे पंतप्रधान के पी ओलींना कोरोना, सुरक्षेसाठी तैनात 76 जवानही बाधित

काठमांडू : जगभरात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरुच आहे. आता नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona infection to Nepal PM KP Oli). यानंतर नेपाळ पंतप्रधान कार्यालय सील करुन त्याचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. पंतप्रधान के. पी. ओली यांच्यासह त्यांचे खासगी सल्लागार आणि डॉक्टरांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. नेपाळ पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात 76 जवानांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

नेपाळ सरकारच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानालाही कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान कार्यालयातही अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर ही ठिकाणी रिकामी करुन निर्जंतुकरण करण्यात आलं आहे.

नुकतंच पंतप्रधान ओली यांचे विशेष डॉक्टर डॉ. दिव्या शाह यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व लोकांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या. यात अनेकजण कोरोना पॉझिटीव्ह निघाले. पंतप्रधान ओली यांच्या सुरक्षेसाठी तैनात नेपाळचे 28 कमांडो, नेपाळ पोलिसांचे 19 अधिकारी, सशस्त्र दलाचे 27 जवान आणि गुप्तहेर खात्यातील 2 अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचंही समोर आलं. यानंतर पंतप्रधान के. पी. ओली यांच्या सुरक्षेतील जवानांच्या तुकड्या बदलण्यात आल्या आहेत.

दरम्या, नुकताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना संसर्ग झाला. जगभरात कोरोना संसर्ग होणाऱ्यांची संख्या 3 कोटी 51 लाखपेक्षा अधिक झाली आहे.

संबंधित बातम्या :

Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, फर्स्ट लेडीसह क्वारंटाईन

Eknath Shinde | एकनाथ शिंदे कोरोनामुक्त, खासदार मुलासोबत रुग्णालयातून घरी

कोरोनाने घरातले आधारवड कोसळले, कुटुंबातील चौघांचा पाठोपाठ मृत्यू

Corona infection to Nepal PM KP Oli

Published On - 4:18 pm, Sun, 4 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI