AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंगाखेडमध्ये कोरोनाचा रुग्ण, संपर्कात आल्याने परभणीतील 9 जणांसह एकूण 20 जण संशयित

पुणे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने औरंगाबादमधील गंगाखेड तालुक्यात तब्बल 20 संशयितांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Corona positive patient in gangapur)

गंगाखेडमध्ये कोरोनाचा रुग्ण, संपर्कात आल्याने परभणीतील 9 जणांसह एकूण 20 जण संशयित
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 03, 2020 | 4:52 PM
Share

औरंगाबाद : पुणे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने औरंगाबादमधील गंगाखेड तालुक्यात तब्बल 20 संशयितांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Corona positive patient in gangapur). यात केवळ गंगापूरमधील 11 जणांचा समावेश आहे. इतर 9 जण परभणीतील आहेत. एकाच ठिकाणी इतके कोरोना संशयित आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. संशयितांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात आणि एकास सेलू येथील रुग्णालयात आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे.

संबंधित कोरोना बाधित रुग्ण गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी असून तो नोकरीनिमित्त पुणे येथे राहत आहे. कोरोना विषाणूंची लक्षणे दिसून आल्याने संबंधित व्यक्तीला पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता त्याला कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचं 22 मार्चला स्पष्ट झालं. यानंतर त्याच्यावर तात्काळ कोरोना विषाणूंचे उपचार सुरु करण्यात आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह असलेली ही व्यक्ती 13 मार्च ते 15 मार्च दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठण येथे नाथशष्टी यात्रेत सहभागी झाली होती. यावेळी नातेवाईक असलेले गंगाखेड तालुक्यातील एकाच गावातील 11 जण त्यांच्या संपर्कात आले होते. यावरुन आरोग्य विभागाने बुधवारी संबंधित गावात जाऊन रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 9 जणांसह दिल्ली येथील निझामुद्दीन येथून परतलेल्यांच्या संपर्कात आलेल्या एकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

एकूण 11 जणांचे स्व्याबचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद शासकीय महाविद्यालयाकडे पाठवले आहेत. त्यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे हे गाव सध्या आपोआपच लॉकडाऊन झालं आहे. अनेक जणांना होम कोरन्टाईनचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

संबंधित बातम्या : गंगाखेडमध्ये कोरोनाचा रुग्ण, संपर्कात आल्याने परभणीतील 9 जणांसह एकूण 20 जण संशयित

मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण

उस्मानाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील ताज हॉटेलमधून गावी आलेला वेटर पॉझिटिव्ह

Corona positive patient in gangapur

Follow Us
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद
राजकीय हालचाली वाढल्या! विजय वडेट्टीवारांच्या सूचक विधानाने खळबळ, शरद पवार गट सत्तेत जाणार की...
शरद पवार गट NDAमध्ये जाणार?; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर!
मोठी बातमी! शरद पवार गट NDAमध्ये जाणार? चर्चांना उधाण; रोहित पवारांनी दिलं सर्वात मोठं उत्तर! म्हणाले...
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ
Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्यावर जबाबदारी
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्याला दिली जबाबदारी अन्...
6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून राऊतांचा...
Sanjay Raut UNCUT | 6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्... कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास...
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका; सुनेत्रा पवारांचं मोठं आवाहन