AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेस्थानके, बस आगार, रिक्षा स्टॉपवर होणार कोरोना चाचणी, नवी मुंबई महापालिका सतर्क

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मोठं पाऊल उचललंय. (Corona test Will held At Railway Station, Bus Stop And market navi Mumbai)

रेल्वेस्थानके, बस आगार, रिक्षा स्टॉपवर होणार कोरोना चाचणी, नवी मुंबई महापालिका सतर्क
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 12:22 PM
Share

नवी मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची (Corona Second Wave) शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबई महापालिका (Navi mumbai Mahapalika) सतर्क झाली आहे. रेल्वेस्थानके, बस आगार, रिक्षा स्टॉपवर कोरोना चाचणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मोठं पाऊल उचललंय. (Corona test Will held At Railway Station, Bus Stop And market navi Mumbai)

नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानक, बस आगार, रिक्षा थांबे, महत्वाच्या बाजारपेठा तसंच इतरही काही महत्त्वाच्या ठिकाणी कोरोना चाचणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विशेष म्हणजे 23 फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

नवी मुंबई पालिकेने नोव्हेंबरच्या आधी कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले. त्यामुळे शहरातील 14 पैकी 9 कोरोना केंद्र बंद केली होती. मात्र दिवाळी सणाच्या काळात नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी गेली होती. तसंच गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. अशातच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता वैद्यकीय जाणकारांनी वर्तवली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijeet Bangar) यांनी आरोग्य विभाग आणि यंत्रणेला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. कोरोनासंबंधीचे काटेकोर नियम बनवून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करणे, कोरोना चाचण्या वाढवणे, संभाव्य परिस्थिती लक्षात घेता आरोग्य यंत्रणा मजबूत करणे यावर आमचं लक्ष आहे, असं अभिजीत बांगर यांनी सांगितलं.

दिल्लीत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल. राज्यात ती येऊ नये असं वाटतं पण मनात भीती असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.

केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथरेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं राजेश टोपे म्हणाले.

(Corona test Will held At Railway Station, Bus Stop And market navi Mumbai)

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल, संयमी राजेश टोपेंचा पहिल्यांदाच रोखठोक इशारा

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता! मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागाकडून भीती व्यक्त

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.