AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल, संयमी राजेश टोपेंचा पहिल्यांदाच रोखठोक इशारा

केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथरेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं राजेश टोपे म्हणाले. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल, असा इशाराच टोपे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल, संयमी राजेश टोपेंचा पहिल्यांदाच रोखठोक इशारा
| Updated on: Nov 20, 2020 | 3:18 PM
Share

रत्नागिरी: दिल्लीत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल. राज्यात ती येऊ नये असं वाटतं पण मनात भीती असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.(Maharashtra should learn from Kerala and Delhi, said Health Minister Rajesh Tope )

केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथरेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं राजेश टोपे म्हणाले. दुसरीकडे शाळा सुरु होत असताना मुलांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी शिक्षकांना जे शक्य असेल ते त्यांनी करावं. नाहीतर एखाद्याला कंत्राट देऊन शाळांचं निर्जंतुकीकरण करावं, अशी विनंती टोपे यांनी केली आहे.

राज्यात सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडण्याची परवानगी राज्य सरकारनं दिलेली आहे. मात्र, आता लग्नासाठी उपस्थिती संख्या वाढवण्याचे संकेतही टोपे यांनी दिले आहेत. तसंच कुणीही कोरोनाला गृहित धरू नये, सर्वांनी काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणं शक्य असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.

मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. तसेच त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 7 हजार 546 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कता बाळगली जात आहे.

दिल्लीची कोरोना परिस्थिती बघता मुंबईत नागरिकांनी सावधानता बाळगली पाहिजे. नो मास्क, नो एंट्री’ ही मोहिम आपल्या सर्वांना कोरोनापासून वाचवू शकते. त्यामुळे सर्वांनी मास्क घाला, अशी विनंती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केली आहे.

प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासनाची प्रशासनाची तयारी आहे का? रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याचा आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला. कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ओपीडी सुरु करणार असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर मोफट टेस्टिंग सेंटरवरही जादा कर्मचारी आणि अन्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या:

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता! मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागाकडून भीती व्यक्त

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच असे नाही: राजेश टोपे

Maharashtra should learn from Kerala and Delhi, said Health Minister Rajesh Tope

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...