Corona virus | आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, मुले आणि वृद्धांना घरी राहण्याचा सल्ला, मोदी सरकारचे मोठे निर्णय

भारतात कोरोनाचा शिरकाव परदेशातूनच झाला आहे, त्यामुळे मोदी सरकारने उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय (Corona virus International flights Cancelled) घेतला.

Corona virus | आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, मुले आणि वृद्धांना घरी राहण्याचा सल्ला, मोदी सरकारचे मोठे निर्णय
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 7:07 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठी (Corona virus International flights Cancelled) पावलं उचलली आहेत. “येत्या 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे एक आठवड्यासाठी रद्द केली आहेत. तर 10 वर्षावरील मुलं आणि 65 वर्षांवरील वृद्धांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.भारतात कोरोनाचा शिरकाव परदेशातूनच झाला आहे, त्यामुळे मोदी सरकारने उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केली (Corona virus International flights Cancelled) आहेत. येत्या 22 मार्चपासून एका आठवड्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द करण्यात येणार आहेत. या काळात भारतात एकही विमान लँड होणार नाही.

त्याशिवाय आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्‍या व्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी Work From Home करावे अशी विनंतीही केंद्र सरकारने केली आहे.

तर 10 वर्षावरील मुलं आणि 65 वर्षांवरील वृद्धांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विद्यार्थी, रूग्ण आणि दिव्यांग प्रवर्ग वगळता रेल्वे आणि नागरी विमान वाहतूक सर्व सवलतीच्या प्रवासाला स्थगिती देण्यात आली आहे.

Corona Death India | देशात ‘कोरोना’चा चौथा बळी, पंजाबमध्ये एकाचा मृत्यू

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर, विस्तारा एअरलाईन्सने 23 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केली आहेत.

दरम्यान देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर पोहोचला (Corona Death India) आहे. आज (19 मार्च) पंजाबमध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची (Corona Death India) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे. तर चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला (Corona virus International flights Cancelled) आहे.

देशात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • आंध्रप्रदेश – 1
  • दिल्ली – 12
  • हरियाणा – 17
  • कर्नाटक – 14
  • केरळ – 27
  • महाराष्ट्र – 49
  • ओडिशा -1
  • पुद्दुचेरी – 1
  • पंजाब – 2
  • राजस्थान 7
  • तामिळनाडू – 2
  • तेलंगाणा – 6
  • चंदीगढमधील केंद्रशासित प्रदेश – 1
  • जम्मू -काश्मीरमधील केंद्रशासित प्रदेश – 4
  • लडाख – 8
  • उत्तरप्रदेश -17
  • उत्तराखंड – 1
  • पश्चिम बंगाल – 1

Corona virus International flights Cancelled

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.