चिंता वाढली! कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ, रोज 1100 लोकांचा मृत्यू

भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख इतक्या वेगाने वाढत आहे की अमेरिका (America) आणि ब्राझिलसारख्या (Brazil) देशांनाही मागे टाकलं आहे. या देशांमध्ये रोज 800 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतो.

चिंता वाढली! कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ, रोज 1100 लोकांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्रं

नवी दिल्ली: भारतात कोरोना संक्रमणाची रोज नवी प्रकरणं समोर येत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मागच्या 24 तासांतही कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. देशात कोरोनाचे 81 हजार 484 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर यावेळी 1,095 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. गेल्या 24 तासांत समोर आलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे देशात एकूण रुग्णांची संख्या 63 लाख 94 हजार 69 वर पोहोचली आहे. (coronavirus cases death total count rising in India corona update)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 99 हजार 773 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संसर्गाचा वेगाने प्रसार होत असल्यामुळे भारत आता संक्रमणात सगळ्यात पुढे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोरोनामुळे रोज देशात 1100 लोकांचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख इतक्या वेगाने वाढत आहे की अमेरिका (America) आणि ब्राझिलसारख्या (Brazil) देशांनाही मागे टाकलं आहे. या देशांमध्ये रोज 800 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतो.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात जगाचा विचार केला तर आतापर्यंत 3 कोटी 44 लाख 81 हजार 663 लोकांना या जीवघेण्या रोगाची लागण झाली आहे. तर 10 लाख 27 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 लाख 12 हजार 660 लोकांनी तर ब्राझिलमध्ये 1 लाख 44 हजार 767 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. अशात भारतात ज्या पद्धतीने हे आकडे वाढत आहेत, त्यानुसार कोरोनाचा प्रकोप होताना दिसत आहे.

गेल्या 24 तासांमध्ये जगभरात मृत्यांच्या आकड्यांनी रेकॉर्ड तोडत 8,826 चा आकडा गाठला आहे. याआधी एका दिवसांत सर्वाधिक 17 एप्रिलला 8513 लोकांचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती भारतात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यात आतापर्यंत 14 लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तब्बल 16,476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आध्र प्रदेशचा नंबर येतो. आंध्र प्रदेशमध्ये 7,00,235 लोक कोरोना संक्रमित आहेत तर 6751 लोकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये 6 लाख 11 हजार 837 लोकांना कोरोना झाला असून मृतांची संख्या 10,070 इतकी आहे. तमिळनाडूमध्ये आतापर्यंत 5688 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 6 लाखापेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. (coronavirus cases death total count rising in India corona update)

संबंधित बातम्या – 

Donald Trump Corona | पत्नीसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना

Corona Update | सुरक्षारक्षक, वाहनचालक, घर कामगारांची कोरोना चाचणी बंधनकारक

(coronavirus cases death total count rising in India corona update)

Published On - 2:17 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI