मुंबई : आशिया आणि युरोपच्या काही भागांमध्ये कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) पुन्हा वाढीचा धोका संभाव्य आहे, यावरूनच केंद्र सरकारने राज्यांना इन्फ्लूएंझा (Influenza) सारखे आजार आणि तीव्र श्वसनाचे आजर Respiratory Infection) यावर ठोस उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून कोणतीही प्रारंभिक लक्षणं दुर्लक्षित होणार नाहीत आणि कोविड नियंत्रणात राहील. इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि श्वसन संक्रमण (SARI) केसेसची तपासणी हे सरकारसाठी कोविड रोखण्याचे मुख्य अस्त्र आहे. अलीकडेच त्याच्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत कारण भारतात कोरोनाचा जोर सध्या कमी झाला आहे. मात्र काही देशात पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. गेल्या तीन कोरोनाच्या लाटांनी देशासह जगाच्या नाकी नऊ आणले होते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहे.