मोठी बातमी: भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड’च्या वितरणाला सुरुवात; लशीची किंमत 500 ते 600 रुपये

सध्याच्या घडीला आम्ही महिन्याला 50 ते 60 कोटी लशींची निर्मिती करत आहोत. फेब्रुवारी महिन्यापर्यंती ही क्षमता 100 कोटींपर्यंत वाढवण्यात येईल. | adar poonawalla

मोठी बातमी: भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड'च्या वितरणाला सुरुवात; लशीची किंमत 500 ते 600 रुपये
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 11:03 AM

नवी दिल्ली: ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेली ‘कोव्हिशील्ड’ (Covishield) ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (adar poonawalla) यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Could seek govt nod for limited use of Covishield in December says Serum CEO adar poonawalla)

अदर पूनावाला यांनी एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. सिरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘कोव्हिशील्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ लोकांना ही लस देण्याला प्राधान्य दिले जाईल.

तर सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत 500 ते 600 रुपये असेल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली. मात्र, केंद्र सरकार या लशीची मोठ्याप्रमाणावर खरेदी करणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी या लशीची किंमत 225 ते 300 रुपये इतकी असेल, असेही पुनावाला यांनी सांगितले.

सध्याच्या घडीला आम्ही महिन्याला 50 ते 60 कोटी लशींची निर्मिती करत आहोत. फेब्रुवारी महिन्यापर्यंती ही क्षमता 100 कोटींपर्यंत वाढवण्यात येईल. देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी 2024 पर्यंतचा कालावधी लागेल, असा अंदाज अदार पुनावाला यांनी वर्तविला.

लस देशभरात पोहोचवण्यासाठी सरकारकडून तयारी सुरु कोव्हिशील्ड’ लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर देशभरात तिचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी सध्या देशभरात ‘कोल्ड चेन स्टोरेज’ची यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. याशिवाय, प्रमुख विमानतळांवर कार्गो युनिटस तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर ग्रूपने दोन्ही ठिकाणी कुलिंग चेंबर्स उभारले आहेत. तर स्पाईस जेटच्या कार्गो इकाई, स्पाईस एक्स्प्रेसने ‘ग्लोबल कोल्ड चेन सोल्यूशन’ या कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे कोरोना लशीची कमी तापमानात वाहतूक करता येणे शक्य होईल.

संबंधित बातम्या:

देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

कोरोना लसीची चाचणी घेतलेल्या स्वयंसेवकाचा अनुभव, पहिल्या इंजेक्शनवेळी वेदना आणि तापाचा करावा लागला सामना!

(Could seek govt nod for limited use of Covishield in December says Serum CEO adar poonawalla)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.