रायगडमधील पुरात मगरीचा थरार, पावसाच्या पाण्यातून थेट घराच्या छतावर

रायगडमधील पुरात मगरीचा थरार, पावसाच्या पाण्यातून थेट घराच्या छतावर

सध्या रायगड जिल्ह्यातील महाडच्या पुराची भीषणता दाखवणारे 2 व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओत घराच्या कौलारु छतापर्यंत पुराचे पाणी आले आहे. त्या पाण्यातूनच एक मगरही घराच्या छतावर पोहचली आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 08, 2019 | 8:25 PM

रायगड : सध्या रायगड जिल्ह्यातील महाडच्या पुराची भीषणता दाखवणारे 2 व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओत घराच्या कौलारु छतापर्यंत पुराचे पाणी आले आहे. त्या पाण्यातूनच एक मगरही घराच्या छतावर पोहचली आहे. त्यामुळे आजुबाजूच्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

संबंधित मगर पुराच्या पाण्यातून घराच्या छपरावर येऊन सैरभैर पळत आहे. त्यामुळे या मगरीला पकडून योग्य ठिकाणी सोडण्याची मागणी नागरिक करत आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजुने एक मगर चालताना दिसत आहे. त्या रस्त्याने जाणाऱ्या एका प्रवाशाने संबंधित मगरीचा व्हिडीओ काढला. त्यामुळे मगरीसारख्या धोकादायक प्राण्यांचा नागरी वस्तीत प्रवेश होत असल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे पुराचं संकट, तर दुसरीकडे या जीवघेण्या प्राण्यांचं संकट अशा दुहेरी संकटात नागरिक सापडल्याचे चित्र रायगडमधील महाड येथे तयार झाले आहे.

दरम्यान, रत्नागिरी-चिपळूण दादर मोहल्ला येथे देखील पुराच्या पाण्यातून एक मोठी मगर गटारात आल्याचे पाहण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती वनखात्याला दिली होती. वन विभागाने चिपळूण येथील ती मगर पकडून योग्य ठिकाम सोडली होती.

जुलैमध्ये सांगली-मिरज कृष्णाघाट येथे बोंद्रे मळ्यात शेतातील मळीत 12 फुटी मगर मृतावस्थेत आढळली होती. मगरीच्या अंगावर जखमा होत्या. मगरीच्या आजूबाजूस मृत माशांचा खच पडलेला होता. डॉक्टरांनी, मगरीचा मृत्यू 24 तासांपूर्वी विषबाधित मासे खाल्ल्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला होता.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें