AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू, भाजप आध्यात्मिक आघाडीचं ठिय्या आंदोलन उधळलं जाणार?

भाजप आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडप नगर परिषद प्रशासनानं रातोरात उखडून टाकला आहे. तसंच तुळजापूर शहरात आज जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हे ठिय्या आंदोलन होणार की उधळलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू, भाजप आध्यात्मिक आघाडीचं ठिय्या आंदोलन उधळलं जाणार?
| Updated on: Nov 06, 2020 | 8:42 AM
Share

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार तुळजाभवानी मंदिराच्या 300 मीटर परिसरात कुणालाही प्रवेश करता येणार नाही. दुसरीकडे राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी तुळजाभवानी मंदिर परिसरात कालपासून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. मात्र, काल रात्री प्रशासनाकडून आंदोलन स्थळावरील तंबू काढून टाकण्यात आलाय. तसंच तुषार भोसले यांना पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.  त्यामुळे हे ठिय्या आंदोलनही उधळलं जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ( A curfew was imposed in Tuljapur, BJP spiritual front agitation is likely to be broken)

‘राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. मुख्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र लिहून त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. मुख्यमंत्र्यांना साधू-संतांशी बोलायला वेळ नाही’, अशी टिका भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी केली आहे. काल राज्यभरातील साधू-महंतांच्या उपस्थितीत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारावर देवीची आरती केली. त्यानंतर राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

नगरपरिषदेने रातोरात मंडप उखडून टाकला

भाजप आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडप नगर परिषद प्रशासनानं रातोरात उखडून टाकला आहे. यासंदर्भात तुषार भोसले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ व आंदोलन करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करताय मात्र त्याला बळी पडणार नाही ,जोपर्यंत मंदिर खुले होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार तुषार भोसले यांनी व्यक्त केला.

“दार उघड उद्धवा, दार उघड!”

‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत गुरुवारी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं. या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं. ( A curfew was imposed in Tuljapur, BJP spiritual front agitation is likely to be broken)

मंदिराचे कुलूप तोडण्याच्या इशाऱ्यानंतर ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेत वाढ

राज्य सरकारने मंदिरे खुली न केल्यास मंदिरांचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करु, या भाजप्रणित अध्यात्मिक आघाडीच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाकडून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कपालेश्वर मंदिरासह नाशिकमधील इतर देवळांच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मंदिरांवरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद

मंदिरं सुरु करण्याच्या मागणीवरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील पत्रप्रपंचही संपूर्ण राज्यानं पाहिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं सुरु करण्याची मागणी केली होती. इतकच नाही तर त्या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाचीही आठवण करुन दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांच्या पत्राला खरमरीत उत्तर दिलं होतं. आमच्या हिंदुत्वाला तुमच्या प्रशस्तीपत्राची गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना जोरदार उत्तर दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्राबाबत तक्रारही केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्रावर जाहीर नाराजी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात काही शब्दांचा वापर टाळायला हवा होता, असं अमित शाह म्हणाले.

संबंधित बातम्या:

“दार उघड उद्धवा, दार उघड!”, तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या

तुळजापुरात आध्यात्मिक आघाडीचे आंदोलन; नगरपरिषदेने रातोरात मंडपच उखाडला

A curfew was imposed in Tuljapur, BJP spiritual front agitation is likely to be broken

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.