Dangerous lift | असंगाशी संग, प्राणाशी गाठ; पालिका कर्मचाऱ्यांची आजीला सांगलीत जीवघेणी लिफ्ट

मिरजेतून घंटागाडीत बसलेल्या आजींना अतिशय धोकादायक प्रवास करावा लागला. त्याचे चित्र पाहून कोणीही हैराण होऊन जाईल.

Dangerous lift | असंगाशी संग, प्राणाशी गाठ; पालिका कर्मचाऱ्यांची आजीला सांगलीत जीवघेणी लिफ्ट
Dangerous lift
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 11:36 AM

सांगलीः आयुष्य एकदाच मिळते. क्षणात होत्याचे नव्हते होते. थोडावेळ दम धरला असता, तर बिघडले असते का, अशी खंडीभर वाक्य, म्हणी एखादा अचानक आपल्याला सोडून गेला की आपण उच्चारतो. मात्र, त्यापासून धडा कोणीच घेत नाही. नेमके असेच सांगलीमध्ये घडल्याचे समोर आले आहे. येथे महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना एका वयोवृद्ध आजीने लिफ्ट मागितली. तेव्हा त्यांना लिफ्ट देण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले. मात्र, त्या आजीला ज्या पद्धतीने आणले, त्यामुळे आजीही भेदरून गेल्या असतील. कशाला घेतली लिफ्ट असा प्रश्न त्यांना त्यावेळी पडलाही असेल. असे कोणाबाबतीतही होऊ शकते. त्यामुळे नेमके झाले काय, ते तुम्हीही घ्या जाणून.

अशी घडली घटना

सांगली जवळच्या मिरजमध्ये एक वयोवृद्ध आजी उभ्या होत्या. त्यांना सांगली येथील विजयगरमध्ये जायचे होते. मात्र, बराच वेळापासून त्यांना वाहन मिळत नव्हते. तेव्हा मिरजेतील एक घंटागाडी चालल्याचे त्यांना दिसले. त्यांनी या कर्मचाऱ्यांना विनंती केली. कर्मचाऱ्यांनीही आजींचे वय पाहून त्यांना लिफ्ट द्यायची तयारी दर्शवली. आजीला घंटागाडीमागील बाजूस बसायला सांगितले. मात्र, आजीचा तो प्रवास अक्षरशः धक्कादायक झाला. त्यामुळे आजींनासुद्धा उगीच या वाहनात बसले आणि लिफ्ट मागितली असे झाले असेल. या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील इतरांनीही समजावले. मात्र, ते काही ऐकले नाहीत.

झाले काय?

मिरजेतून घंटागाडीत बसलेल्या आजींना अतिशय धोकादायक प्रवास करावा लागला. त्याचे चित्र पाहून कोणीही हैराण होऊन जाईल. एक तर चालकाने गाडीचा वेग सुसाट ठेवलेला. त्यात आजी मागे एका बाजूला अक्षरशः लटकलेल्या परिस्थितीत होत्या. त्यांचा हात सुटला असता, तर अनर्थच ओढवला असता. हा प्रकार मिरज-सांगली हायवेवरच्या अनेकांना खटकला. त्यांनी चालकाला गाडी थांबवून तसे सांगितलेही. मात्र, त्याने हे गांभीर्याने तर घेतलेच नाही. शिवाय आपल्या वाहनाचा वेगही कमी केले नसल्याचे समोर आले आहे. या जीवघेण्या प्रवासाचा इतरांनी व्हिडिओ केला असून, तो पाहून कोणालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

महापालिका जबाबदारी घेणार का?

एक तरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घंटागाड्यातून कोणालाही लिफ्ट देऊ नये. कारण या गाड्या त्यासाठी नाहीतच. कधी वेळेप्रसंगी मदत केली, तरीही भान ठेवावे. ज्या व्यक्तीला आपण गाडीतून लिफ्ट दिलीय, त्याच्या जीवाची तरी काळजी घ्यावी. व्यवस्थित पुढे बसवून किंवा मागेही  ती व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत राहू नये, याची दक्षता घ्यावी. विशेष म्हणजे केव्हाही गाडीच्या कमाल वेगाची मर्यादा पाळावी. जर एखादा अपघात घडला. त्यात अशा व्यक्तीचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी महापालिका घेणार की हे कर्मचारी, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.