आई-भावावर हल्ला करुन तरुणी प्रियकरासोबत अंदमानला रवाना, आईचा मृत्यू

आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना नुकतीचं कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये उघडकीस (Daughter murdered her mother Bengaluru) आली आहे.

आई-भावावर हल्ला करुन तरुणी प्रियकरासोबत अंदमानला रवाना, आईचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 06, 2020 | 7:26 PM

बंगळुरु : आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना नुकतीचं कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये उघडकीस (Daughter murdered her mother Bengaluru) आली आहे. बंगळुरुमध्ये एका मुलीने आई आणि भावावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर भाऊ गंभीर जखमी झाला आहे. अमृता असे या आरोपी मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे हा हल्ला केल्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत अंदमान निकोबार बेटावर फिरण्यासाठी निघून गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता ही इंजिनिअर आहे. अमृताने 2 फेब्रुवारीला तिच्या आई आणि भाऊ हरीशवर चाकूने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यानंतर जखमी भावाने मदतीसाठी पोलिसांना फोन केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

अमृताने आई आणि भावावर हत्या करण्यापूर्वी तिची बदली हैद्राबादला करण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्या कारणामुळे कदाचित तिला तिथे जावं लागू शकतं, असंही तिने सांगितले होते. सोमवारी ती काही तरी शोधत असताना तिच्या भावाने तिला काही मदत हवी का? असे विचारले. त्यावेळी तिने नकार दिला आणि काही मिनिटांतच त्याच्यावर आणि आईवर हल्ला केला.

अमृताने आई आणि भावावर हल्ला केल्यानंतर त्यांना तशाच परिस्थितीत सोडून ती आपल्या प्रियकराला भेटायला निघून गेली. तिच्या घरापासून काही अंतरावरच तिचा प्रियकर बाईकवर तिची वाट बघत होता. यानंतर ते दोघेही एअरपोर्टवर गेले. त्यांनी सकाळी 6.30 ला पोर्ट ब्लेयर (अंदमान निकोबार) ला जाण्यासाठी फ्लाईट पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताच्या कुटुंबावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. त्यामुळे ती त्रस्त झाली होती. तिने वडिलांच्या उपचारासाठी 2013 मध्ये 4 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र ते कर्ज वाढून आता 18 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं. अमृताला कुटुंबाला अडचणीत आणायचे नव्हते. त्यामुळे तिने आपल्या आई आणि भावाची हत्या करण्याचा प्लॅन केला. त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व प्लॅनची माहिती तिने तिच्या प्रियकराला दिली होती.

“हे प्रकरण दिसतं त्याप्रमाणे सरळ नाही. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. यात जे काही तथ्य असेल ते लवकरच समोर येईल,” अशी माहिती पोलीस अधिकारी एमएन अनुछेथ यांनी (Daughter murdered her mother Bengaluru) दिली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.