विवाहितेच्या मृत्यूने माहेरच्यांचा संताप, सासरच्या मंडळींना बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटना
बिडकीन येथील सदर विवाहितेला वीजेचा धक्का लागल्याने तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय माहेरच्या मंडळींना आहे. शुक्रवारी सदर विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर मात्र माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात चांगलाच गोंधळ माजवला.

विवाहितेच्या मृत्यूनंतर औरंगाबादमधील घाटी रुग्णालय परिसरात सासरच्या मंडळींना मारहाण
औरंगाबादः बिडकीन परिसरातील विवाहितेच्या मृत्यूनंतर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. वीजेच्या धक्क्याने सदर विवाहितेचा मृत्यू झाल्याचे सासरचत्या मंडळींकडून सांगण्यात आले. मात्र सदर महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय घेत, सासरच्या मंडळींना मारहाण केली. यामुळे शहरातील घाटी रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.