4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू

अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमध्ये बुलेटस्वारांनी केलेल्या छेडछाड आणि पाठलागात मृत्यू झालाय (US Scholarship Student chasing in UP)

4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 11, 2020 | 12:13 PM

लखनौ : अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात बुलेटस्वारांकडून झालेल्या छेडछाड आणि पाठलागात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (US Scholarship Student chasing in UP). सुदीक्षा भाटी असं या तरुणीचं नाव आहे. तिला तिच्या उच्च शिक्षणासाठी एचसीएलकडून तब्बल 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. ती नुकतीच काही दिवस सुट्टीवर आली असताना तिचा अपघातात मृत्यू झाला. काही बुलेटस्वारांनी सुदीक्षाचा पाठलाग केल्यानंतर हा अपघात झाला.

सुदीक्षा अमेरिकेतील बॉब्सन येथे शिक्षण घेत होती. यासाठी तिला 3.80 कोटी रुपयांची विशेष स्कॉलरशीपही मिळाली. नुकतीच ती काही दिवस सुट्टीसाठी भारतात आली होती. त्याच दरम्यान ती आपल्या काकांसोबत औरंगाबादला मामांच्या घरी जात होती. त्यावेळी काही बुलेटस्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. याच दरम्यानच्या गोंधळात सुदीक्षाच्या गाडीचा अपघात झाला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सुदीक्षा गौतमबुद्ध नगरमधील दादरी येथे राहत होती. ती अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आली. ती शैक्षणिकदृष्ट्या अतिशय हुशार मुलगी होती. तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील बॉब्सन येथे स्कॉलरशिपही मिळाली. नुकतीच ती काही दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आली होती. ती आपल्या काकांसोबत औरंगाबादला मामांच्या घरी जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला. त्यात सुदीक्षाचा मृत्यू झाला. तिचे वडील ढाबा चालवतात.

सुदीक्षाचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. त्यानंतर विशेष प्रवेश परीक्षेतून तिला एचसीएलच्या मालिक शिव नदार (सिकंदराबाद) शाळेत प्रवेश मिळाला. सुदीक्षाने 12 वीमध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिची निवड अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये झाली. पुढील शिक्षणासाठी सुदीक्षाला एचसीएलकडून 3.80 कोटी रुपयांची स्कॉलरशिपही मिळाली होती.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सुदीक्षा भाटीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे, “आम्ही बाईकवरुन औरंगाबादला जात होतो. त्यावेळी आमच्या गाडीचा बुलेटवर असलेल्या दोन युवकांनी पाठलाग गेला. ते कधी आपली बुलेट पुढे न्यायचे तर कधी सुदीक्षावर शेरेबाजी करायचे. इतकंच नाही तर ते बुलेटचे स्टंटही करत होते. हेच करत असताना त्या बुलेटस्वारांनी आमच्या गाडीच्या समोर येऊन अचानक बुलेटचा ब्रेक दाबला. त्यामुळे आमच्या बाईकची बुलेटला धडक बसली.” यात सुदीक्षा गंभीर जखमी झाली. तिचा जागेवरच मृत्यू झाला.

20 ऑगस्टला अमेरिकेला परतण्याचं नियोजन

सुदीक्षाला 20 ऑगस्टला अमेरिकेला परत जायचं होतं. याआधीच तिचा रस्ता दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या कुटुंबाने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा :

Rahat Indori | प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

Rhea Chakraborty ED | तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे नाराजीचा सूर

US Scholarship Student chasing in UP

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें