दिवाळीनिमित्त राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांना आकर्षक फुलांची आरास, विठ्ठल-रुक्मिणी, साईबाबा, सिद्धिविनायक, काळाराम मंदिर सजलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरं बंद आहेत. मात्र नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मुंबईतिल सिध्दिविनायक, शिर्डीचं साईबाबा मंदिर आणि नाशिकच्या काळाराम मंदिराला फुलांची आरास आणि आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.

दिवाळीनिमित्त राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांना आकर्षक फुलांची आरास, विठ्ठल-रुक्मिणी, साईबाबा, सिद्धिविनायक, काळाराम मंदिर सजलं

मुंबई : दिवाळीनिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्यामुळे मंदिरांमध्ये विशेष पूजाही घालण्यात आली. पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आज लाल आणि पिवळ्या रंगांच्या जर्बेरा फुलांनी सजलं आहे. या सजावटीसाठी जवळपास 2 टन केशरी फुलांचा वापर करण्यात आला आहे. लाल आणि पिवळ्या रंगात विठ्ठल आणि रुख्मिणी मातेचं रुप अधिक खुललं आहे. या फुलांनी विठ्ठलाचा गाभारा, रुक्मिणी मातेचा गाभारा, खोळखांबी, बाजीराव पडसाळी, प्रवेशद्वार अशा ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेलं आहे. (Attractive decoration to various temples in the state on the occasion of Diwali)

दुसरीकडे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर अधिक मनमोहक भासतं. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असलं तरी भाविक मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेत आहेत आणि या विद्यूत रोषणाईचा आनंद घेत आहेत. दिवाळीनिमित्त करण्यात आलेली ही रोषणाई मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

दिवाळीनिमित्त करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईच्या रंगीबेरंगी रंगात शिर्डीचं साईबाबा मंदिरही न्हाऊन निघालं आहे. कोरोनामुळं गेल्या 8 महिन्यांपासून मंदिर बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घालून दिलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करुन अगदी साध्या पद्धतीनं दिवाळी साजरी करण्याचा निर्णय साईबाबा मंदिर संस्थानकडून घेण्यात आला आहे.

नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आज पहाटे श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घालण्यात आलं. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन दोन्ही एकाच दिवशी आलं आहे. त्यानिमित्त तिन्ही मूर्तींना सुगंधी तेल आणि उटणे लावून स्नान घालण्यात आलं. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी पुरुषोसुक्ताचं आवर्तन करण्यात आलं. पहाटेच्या सुमारास पार पडलेल्या या सोहळ्यामुळं मंदिर परिसर मंत्रोच्चाराने भारावुन गेला होता. यंदा मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना दर्शन मात्र घेता येत नाही.

संबंधित बातम्या:

पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट

पंढरपूर : मोक्षदा एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट

दगडूशेठ हलवाई मंदिराला 60 हजार किलो फुलांची सजावट

Attractive decoration to various temples in the state on the occasion of Diwali

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI