डिप्रेशनची हेटाळणी करणाऱ्या सलमानला दीपिका पदुकोणने सुनावलं

डिप्रेशनने ग्रासण्याची लक्झरी परवडणारी नाही, असं म्हणत गेल्या वर्षी सलमान खानने हेटाळणी केली होती. त्यावर डिप्रेशन कोणी स्वतःहून निवडत नाही, असं म्हणत दीपिका पदुकोणने खरमरीत उत्तर दिलं आहे

डिप्रेशनची हेटाळणी करणाऱ्या सलमानला दीपिका पदुकोणने सुनावलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ने आपल्याला डिप्रेशन (Depression) ने ग्रासल्याची कबुली देऊन चार वर्ष उलटली. त्यानंतर गेल्या वर्षी अभिनेता सलमान खान (Salman Khan) ने डिप्रेशनबाबत केलेल्या कमेंटवरुन दीपिकाने त्याला आता सुनावलं आहे. डिप्रेशन कोणी स्वतःहून निवडत नाही, असं म्हणत दीपिकाने सलमानला खरमरीत उत्तर दिलं आहे.

‘वोग’ मासिकाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सलमानच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. ‘डिप्रेशन कोणी स्वतःहून निवडत नाही. नैराश्याने ग्रासणं म्हणजे दुःखी असणं, अशी गल्लत सामान्य लोकांची होते. एका पुरुष कलाकाराने डिप्रेस्ड राहण्याची विलासीनता (luxury) परवडू शकत नाही, असं म्हटलं होतं. जणू काय डिप्रेशन ही तुमची चॉईस आहे’ अशा शब्दात दीपिकाने सलमानचा समाचार घेतला.

फेब्रुवारी 2018 मध्ये TiE ग्लोबल समीटमध्ये सलमान बोलत होता. ‘मी हल्ली खूप जणांना निराश (डिप्रेस्ड) आणि भावनिक झालेलं पाहतो. पण मला डिप्रेस्ड राहण्याची किंवा दुःखी असण्याची किंवा भावनिक होण्याची विलासीनता परवडू शकत नाही. कारण ते माझ्या पथ्यावर पडत नाही’ असं सलमान म्हणाला होता.

सलमानने गेल्या वर्षी डिप्रेशनवर केलेल्या भाष्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेक ट्विटराईट्सनी सलमानवर टीका केली होती.

मी डिप्रेशनने पछाडले होते, अशी कबुली दीपिकाने 2015 मध्ये दिली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये ती याबाबत मोकळेपणाने बोलली होती. ‘डिप्रेशन म्हणेज चैनीची गोष्ट समजली जाते. ज्यांच्याकडे पुष्कळ पैसा-अडका आहे, ते डिप्रेशनमध्ये जातात, असा सर्वसामान्य समज आहे. पण हा मिथक मोडण्याची गरज आहे’ असं दीपिका म्हणाली होती.

दीपिकाने नैराश्याबाबत मोकळेपणाने दिलेल्या कबुलीमुळे अनेक जणांना या मानसिक आजाराबद्दल बोलण्याचं धाडस मिळालं होतं.

दीपिका सध्या अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर आधारित, मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI