राजनाथ सिंह यांचे पुत्र, भाजप आमदार पंकज सिंह यांना कोरोनाची लागण

पंकज सिंह हे उत्तर प्रदेशातील नोएडा मतदारसंघातून आमदार असून त्यांच्याकडे यूपी भाजपच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.

राजनाथ सिंह यांचे पुत्र, भाजप आमदार पंकज सिंह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र आणि भाजप आमदार पंकज सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकज सिंह यांनी ट्विट करुन आपली कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. (Defense Minister Rajnath Singh son Pankaj Singh tested COVID Positive)

“कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी करुन घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःला आयसोलेट करा आणि स्वतःची चाचणी करा” असे आवाहन पंकज सिंह यांनी केले आहे.

पंकज सिंह हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र. पंकज हे उत्तर प्रदेशातील नोएडा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांच्याकडे यूपी भाजपच्या उपाध्यक्ष पदाचीही जबाबदारी आहे.

दरम्यान, पंकज सिंह यांच्या आधी योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री मोहसीन रझा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मोहसीन रझा यांनी सोमवारी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन रझा यांनी केले.

हेही वाचा : राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

यूपी सरकारचे जल ऊर्जामंत्री डॉ. महेंद्रसिंह, क्रीडामंत्री उपेंद्र तिवारी, राजेंद्र प्रताप सिंह, धरमसिंह सैनी आणि स्वतंत्रदेव सिंह यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर मंत्री आणि क्रिकेटपटू चेतन चौहान आणि मंत्री कमल राणी वरुण यांचे कोरोना संसर्गानंतर निधन झाले. (Defense Minister Rajnath Singh son Pankaj Singh tested COVID Positive)

Published On - 9:28 am, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI