Delhi Election Result : ‘छोटा केजरीवाल’ सोशल मीडियावर व्हायरल

एकीकडे आपचे अरविंद केजरीवाल पुन्हा जिंकणार यावर आप नेत्यांचा विश्वास आहे. तर, दुसरीकडे यंदा दिल्लीत भाजपची सत्ता येणार असा दावा भाजप नेते करत आहेत. यासर्वांमध्ये दोन चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं आहे.

Delhi Election Result : 'छोटा केजरीवाल' सोशल मीडियावर व्हायरल

Delhi Election Results 2020 : दिल्लीसाठी आजची सकाळ अत्यंत खास आहे. कारण आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येणार आहेत. दिल्लीमध्ये सामान्य जनतेने कुणाला निवडून आणलं हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या सर्वच नेत्यांच्या नजरा आजच्या निकालावर असणार आहे. एकीकडे आपचे अरविंद केजरीवाल पुन्हा जिंकणार यावर आप नेत्यांचा विश्वास आहे. तर, दुसरीकडे यंदा दिल्लीत भाजपची सत्ता येणार असा दावा भाजप नेते करत आहेत. यासर्वांमध्ये दोन चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं आहे.

मतमोजणीपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी एका चिमुकलीने गुलाबाच्या फुलांपासून रांगोळी रेखाटली. तर, एक चिमुकला चक्क छोटे अरविंद केजरीवाल बनून आला. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

अरविंद केजरीवाल सकाळी 8.30 ते 9 वाजेदरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पोहोचतील. अरविंद केजरावालसह इतर नेतेही पक्षाच्या कार्यालयातून निकालांवर नजर ठेऊन राहातील. निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाच्या गच्चीवरुन अरविंद केजरीवाल हे नागरिकांना धन्यवाद देतील, असा प्लॅन आपने केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI