Pravin Tarde : ‘देऊळ बंद 2’ साठी शाहरुख खान याचा पुढाकार, नाहीतर सिनेमा प्रदर्शित झालाच नसता… अभिनेत्याने नेमकं केलं तरी काय?
Pravin Tarde : शाहरुख खान नसता तर, स्वामींच्या अद्भूत लीला अनुभवता आल्याच नसत्या, सिनेमासाठी किंग खान याने असं केलं तरी काय? प्रवीण तरडे यांनी अखेर सांगितलंच...

Pravin Tarde : अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. याकाळात शाहरुख याने अनेक हीट सिनेमे तर दिलेच पण अनेकांची मदत देखील केली. दरम्यान, एक मोठं सत्य समोर आलं आहे, ‘देऊळ बंद 2’ सिनेमासाठी अभिनेता शाहरुख खान याने मोठी मदत केली आहे. याचा खुलासा खुद्द प्रवीण तरडे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘देऊळ बंद 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगळी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने 80 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे… पण अभिनेता शाहरुख खान एक मदत झाली नसती तर, हे शक्य नव्हतं. शाहरुख याच्यामुळे ‘देऊळ बंद 2’ सिनेमातं 40 – 45 लाखांचं बील माफ झालं आहे… असं प्रवीण तरडे म्हणाले आहेत.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी सिनेमाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सिनेमाचं मोठं बील शाहरुख खान याच्यामुळे कसं माफ झालं? याबद्दल सांगताना प्रवीण तरडे म्हणाले, ‘हेमंत गुजराती यांचा पुण्यात ‘डॉन’ नावाचा स्टुडिओ आहे. त्यांचे देखील आभार मानले पाहिजे. सिनेमाचं बजेट पूर्णपणे संपलं होतं… सिनेमाचा DCP काढायचा होता. DCP म्हणजे Digital Cinema Package सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी वापरला जाणारा डिजिटल फॉरमॅट… पण त्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. सिनेमाचं बजेट 12 लाख रुपयांचं होतं आणि ते 42 लाख रुपयांवर पोहोचलं होतं… एवढे पैसे आणायचे तरी कुठून?’
पुढे प्रवीण तरडे म्हणाले, ‘पैसे नव्हते म्हणून आम्ही शाहरुख खान यांच्या रेड चिलीज कंपनीला विनंती केली… ही बातमी शाहरुख खान यांच्यापर्यंत पोहोचवा असं सांगितलं. ‘मुलशी फॅटर्न’ वाल्याचा सिनेमा आहे म्हणून त्यांच्या लवकर लक्षात आलं, कारण सलमान खान याने ‘अंतिम’ सिनेमा केलेला. पैसे अल्याशिवाय DCP काढता येत नाही… अशा परिस्थिती शाहरुख खानने बील माफ करण्यास सांगितलं… सिनेमा चांगला आहे, म्हटल्यानंतंर शाहरुखने मदत केली.. रेड चिलीजने 40 – 45 लाख बील माफ केलं. सिनेमा चांगला बनला आहे, पैशांचं नंतर पाहू… असं रेड चिलीज कंपनीने सांगितलं… यामध्ये शाहरुख खान सरांना जे काही वाटलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना? असं देखील प्रवीण तरडे मुलाखतीत म्हणाले. ‘
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘देऊळ बंद 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. आता प्रेक्षक ‘देऊळ बंद 3’ च्या प्रतिक्षेत आहे. सिनेमाच्या शेवटी राघव शास्त्रीला म्हणजे अभिनेतागश्मीर महाजनी याला अमेरिकेत असताना थेट अक्कलकोटहून स्वामी समर्थांचा फोन येतो. त्यानंतर दोघांचं बोलणं देखील होतं.. आता ‘देऊळ बंद 3’ मध्ये काय असणार हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.
