AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवभूमी केरळला पर्यटनात जागतिक मान

केरळ राज्य ज्याप्रमाणे सुंदर पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे, हे वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. इतर राज्यांतील लोकसुद्धा हे सण पाहण्यासाठी येतात. या राज्याला यंदा पर्यटनाचा बहुमान मिळाला आहे.

देवभूमी केरळला पर्यटनात जागतिक मान
KERALA1Image Credit source: KERALA1
| Updated on: Jan 14, 2023 | 12:45 PM
Share

केरळ : जगात 2023 साठी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी अशा स्थळांची यादी न्यूयॉर्क टाईम्सने जारी केली आहे. आश्चर्यकारक एक गोष्ट ही आहे की एकूण 52 स्थळांच्या या यादीत आपल्या भारतातील केवळ केरळ या  एका पर्यटन स्थळाची निवड झाली आहे. पर्यटनासाठी केरळ सरकारने घेलेल्या मेहनतीला दाद देत पर्यटकांना खरोखरच येथे गावातील जीवन अनुभवता येते, अशा शद्बात केरळचे न्यूयॉर्क टाइम्सने कौतूक केले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने पर्यटनासाठी जगातील उत्कृष्ट स्थळांची निवड केली आहे. त्यात केरळ राज्याला बहुमान दिला आहे. केरळ राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जाते. ‘गॉड्स अवन कंट्री’ असे ज्याला म्हटले जाते त्या केरळ शहराची न्यूयॉर्क टाईम्सने 2023 च्या पर्यटन सूचित निवड केली आहे. या यादीत आपल्या केरळचा क्रमांक तेरावा आला आहे.

सुंदर निळेशार हीरवे पाचू सारखे समुद्रकिनारे, कुमाराकोम सारख्या शहरातील बॅकवॉटरची मजा, लज्जतदार पाककृती आणि केरळच्या वैकंष्टमी उत्सवासारख्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांमुळे केरळ हे सर्वोच्च पर्यटन स्थळ म्हणून सूचीबद्ध करण्या आले आहे. पर्यटनासाठी केरळ सरकारने आखलेल्या रणनीतीचे कौतूक करीत येथे पर्यटकांना खरोखरचे गावातील जीवन अनुभवता येते, अशा शद्बात केरळला न्यूयॉर्क टाइम्सने प्रोत्साहीत केले आहे.

केरळाशिवाय या यादीत लंडन, जपानच्या मोरीओका, स्कॉटलंडच्या किलमार्टीन ग्लेन, न्यूझीलंडचे ऑकलंड, कॅलिफार्नियाचे पाम स्पिंग्ज, ऑस्ट्रेलियाचे कंगारू आयलँड, अल्बानियाची वजोसा रिव्हर, नॉर्वेच्या ट्रोम्सोची निवड केली आहे.

केरळ हे सुंदर किनारे, उत्कृष्ट पर्यटन आणि निर्सगाने परिपूर्ण असलेले एक राज्य आहे. केरळ संपूर्ण भारतभर एक प्रसिद्ध ठिकाण येथे लाखो पर्यटक भेट देत असतात. तसेच केरळ राज्य सांस्कृतिक आणि पारंपारिक उत्सव साजरे करण्यात देखील प्रसिध्द आहे. गेल्यावर्षी, केरळला टाइम मॅगझिनने 2022 च्या जगातील सर्वोत्कृष्ट 50 ठिकाणांच्या यादीत सूचीबद्ध केले होते.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.