प्रसव कळांनी विव्हळणाऱ्या महिलेला बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ, कळा वाढताच बांबू वाहणारे जीव तोडून धावले

महिलेला जशा प्रसव कळा वाढत होत्या, तसं बांबूची झोळी वाहणाऱ्यांना पायाचा वेग वाढवून धावावं लागत होतं.

प्रसव कळांनी विव्हळणाऱ्या महिलेला बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ, कळा वाढताच बांबू वाहणारे जीव तोडून धावले

धुळे : नव्याने आलेल्या कोरोना विषाणूची लस (Dhule Pregnant Lady Help) शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. मात्र इकडे महाराष्ट्रातील वाड्या-वस्त्या अजूनही जुन्याच समस्यांशी झगडत आहेत. प्रसव कळांनी विव्हळणाऱ्या महिलेला बांबूच्या झोळीत ठेवून, खांद्यावरुन तब्बल तीन किलोमीटर धावत नेल्याचा (Dhule Pregnant Lady Help) थरारक प्रकार समोर आला आहे.

महिलेला जशा प्रसव कळा वाढत होत्या, तसं बांबूची झोळी वाहणाऱ्यांना पायाचा वेग वाढवून धावावं लागत होतं. प्रगत महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात ही घटना घडली. सुदैवाने तीन किमी धावल्यानंतर 108 नंबरची रुग्णवाहिका आली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेची सुखरुप प्रसुती झाली.

शिरपूर तालुक्याजवळ असलेल्या थुवानपाणी या अतिदुर्गम भागातील नागरिकांवर ही वेळ आली. अतिदुर्गम असलेल्या थुवानपाणी या आदिवासी पाड्यावर पक्का रस्ता नाही. या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर गुऱ्हाळपाणी हे गाव आहे. थुवानपाणीतून गुऱ्हाळपाणीपर्यंत कच्च्या रस्त्याने चालतच यावं लागतं. थुवानपाणी गावातील एक महिला गरोदरी होती. तिला प्रसववेदना सुरु झाल्याने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होतं. मात्र रुग्णवाहिका थुवानपाणी गावात पोहोचणं शक्य नव्हतं.

प्रसववेदना सुरु झाल्याने कुटुंबियांनी पारंपारिक पद्धतीचा अवलंब करण्याचं ठरवलं. त्यासाठी मोठा बांबू काढून त्याला साडी बांधली आणि त्याची झोळी करुन महिलेला झोपवलं. मग ती झोळी बांधलेला बांबू उचलून पाड्यावरील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेने कूच केली (Dhule Pregnant Lady Help). झोळीतून तिला गुऱ्हाळपाणी गावापर्यंत नागरिकांनी खांद्यावर पळत नेण्यात आले.

त्यानंतर तेथील आशा कार्यकर्तीने बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका मागवली. सुदैवाने रुग्णवाहिका पोहोचली आणि महिलेला बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे तिची सुखरुप प्रसुती झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

या भागासाठी रस्ता आणि आरोग्य उपकेंद्र द्यावे अशी मागणी ग्रामस्थ गेल्या आठ वर्षापासून करत आहेत (Dhule Pregnant Lady Help).

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमुळे तंबाखू पुरवून पुरवून खाण्याची वेळ, मित्राने पुडी न दिल्याने मारहाण

वर्ध्यात झाडाखालीच रुग्णालय उभारलं, जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना तपासणी करुनच एण्ट्री

Ratnagiri Corona Patient | मुंबईच्या रुग्णाचा दापोलीत थरार, पळून गेलेला कोरोना रुग्ण 13 तासांनी जंगलात सापडला

Published On - 10:03 pm, Thu, 14 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI