Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 27,524 वर

राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 524 वर पोहोचला आहे.

Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 27,524 वर
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 9:37 PM

मुंबई : राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 524 वर पोहोचला आहे. राज्यात आज दिवसभरात 512 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Maharashtra Corona Update).

राज्यात आज दिवसभरात 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील 25, नवी मुंबईतील 10,  पुण्यातील 5, औरंगाबाद शहरातील 2,  पनवेल आणि कल्याण डोंबिवली येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 1 हजार 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 16,738 वर

राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाने कहर केला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या आता 16 हजार 738 वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत तब्बल 621 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण

राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 314 वर पोहोचली आहे. तर 175 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

ठाणे शहरातील बाधितांचा आकडा 1,215 वर

ठाण्यातही कोरोनाचे रोज नवे रुग्ण आढळत आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 215 वर पोहोचली आहे. तर कल्याण डोंबिवली शहरातील बाधितांचा आकडा 424 वर पोहोचला आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकड्यांनी 1100 चा आकडा पार केला आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 113 वर पोहोचला आहे. तर मुंबईलगत असलेल्या वसई-विरार, मीरा-भाईदर येथील कोरोना रुग्णांचा आकडा 200 च्या पुढे गेला आहे.

मालेगाव आणि औरंगाबादेत कोरोनाचा कहर

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. मालेगावातील कोरोनाबाधितांचा आकडा थेट 649 वर पोहोचला आहे. तर औरंगाबाद येथील कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या पुढे गेला आहे. त्यामुळे धाकधुक वाढली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातील बाधितांचा आकडाही झपाट्याने वाढला आहे. जळगावमधील कोरोनाबाधितांचा आकडा आता 200 च्या पार गेला आहे. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येदेखील कोरोना फोफावत चालला आहे.

राज्य सरकारचे शर्थीने प्रयत्न

कोरोनावर नियंत्रण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रचंड मेहनत घेत आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 40 हजार 145 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 12 हजार 621 रुग्णांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

राज्यात सध्या 1512 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14,253 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 59.04  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. याशिवाय राज्यात 3 लाख 15 हजार 686 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 16738 374 621
पुणे (शहर+ग्रामीण) 3159 938 171
पिंपरी चिंचवड मनपा 155 34 4
ठाणे (शहर+ग्रामीण) 1381 36 14
नवी मुंबई मनपा 1113 80 14
कल्याण डोंबिवली मनपा 424 91 4
उल्हासनगर मनपा 82 0
भिवंडी निजामपूर मनपा 39 11 2
मिरा भाईंदर मनपा 248 143 2
पालघर 42 1 2
वसई विरार मनपा 295 105 11
रायगड 166 5 2
पनवेल मनपा 161 9
नाशिक (शहर +ग्रामीण) 158 2 0
मालेगाव मनपा 649 34
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 70 36 3
धुळे 71 6
जळगाव 223 1 26‬
नंदूरबार 22 2
सोलापूर 344 41 21
सातारा 125 3 2
कोल्हापूर 25 2 1
सांगली 43 29 1
सिंधुदुर्ग 7 2 0
रत्नागिरी 83 2 3
औरंगाबाद 716 14 19
जालना 20 0
हिंगोली 61 1 0
परभणी 2 1
लातूर 32 8 1
उस्मानाबाद 4 3 0
बीड 1 0
नांदेड 57 4
अकोला 208 14 12
अमरावती 92 13
यवतमाळ 99 22 0
बुलडाणा 26 8 1
वाशिम 3 0
नागपूर 331 84 2
वर्धा 1 0 1
भंडारा 1 0 0
गोंदिया 1 1 0
चंद्रपूर 5 1 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 41 0 10
एकूण 27524 6059 1019

संबंधित बातम्या :

Corona | सोलापुरात कोरोनाचा कहर, 32 दिवसात 300 रुग्णांचा टप्पा पार, आठवड्याला सरासरी 70 नवे रुग्ण

कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.