AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nishikant Kamat | प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत याचे निधन

निशिकांत कामत याच्यावर लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु (Director Nishikant Kamat passed away) होते.

Nishikant Kamat | प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत याचे निधन
| Updated on: Aug 17, 2020 | 5:57 PM
Share

हैदराबाद : मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत याचे आज (17 ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या 50 व्या वर्षी हैदराबादमधील ‘एआयजी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामत याच्यावर लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील गच्चीबोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.(Director Nishikant Kamat passed away) ‘डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे.

“निशिकांत कामत यांना 31 जुलैला ताप आणि थकवा आल्याने AIG रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गोळ्या आणि इतर औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी सुधारली.

त्यानंतर मात्र त्यांचे यकृत निकामी झाले. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असताना त्यांचे अवयव निकामी झाले. दरम्यान आज त्यांची प्रकृती जास्त खालवली. दुपारी 4 वाजून 26 मिनिटांनी त्यांचे निधन झाले,” अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

निशिकांत कामत यांचा परिचय

निशिकांत कामत यांचा जन्म 17 जून 1970 रोजी मुंबईतील दादर भागात झाला. रुईया कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. निशिकांत कामत यांनी 2004 मध्ये ‘सातच्या आत घरात’ सिनेमातून लेखक आणि अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्याच वर्षी निशिकांत यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्यांनी आर माधवनसह या सिनेमाचा तामिळमध्ये रिमेक केला.

निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’ यासारख्या एकापेक्षा हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘ज्युली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’, फुगे, ‘डॅडी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनयही केला आहे.

अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी दिग्दर्शन थांबवून केवळ अभिनेता म्हणूनच काम केलं. ‘दरबदर’ या आगामी सिनेमाचे ते दिग्दर्शनही करणार आहेत.

मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर निशिकांत कामत यांनी ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं. ‘रॉकी हॅण्डसम’ या सिनेमात त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका चांगलाच भाव खाऊन गेली. (Director Nishikant Kamat passed away)

संबंधित बातम्या : 

प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, रुग्णालयाचे हेल्थ बुलेटीन

Follow Us
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत