AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसाबसह 37 गुन्हेगारांना फासापर्यंत पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बोयपिक

'ओ माय गॉड' आणि '102 नॉट आऊट'सारख्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेले दिग्दर्शक उमेश शुक्ला आता भारतातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Biopic on Ujjwal Nikam) यांच्या जीवनावर चित्रपट बनवत आहेत.

कसाबसह 37 गुन्हेगारांना फासापर्यंत पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बोयपिक
| Edited By: | Updated on: Feb 08, 2020 | 4:10 PM
Share

मुंबई : ‘ओ माय गॉड’ आणि ‘102 नॉट आऊट’सारख्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेले दिग्दर्शक उमेश शुक्ला आता भारतातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Biopic on Ujjwal Nikam) यांच्या जीवनावर चित्रपट बनवत आहेत. या बायोपिकचे नाव ‘निकम’ असं ठेवलं आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात (Biopic on Ujjwal Nikam) येणार आहे.

आतापर्यंत भारतातील सर्वात वादग्रस्त आणि हाय प्रोफाईल प्रकरणात दमदार भूमिका निभवणाऱ्या व्यक्तीची कथा यामधून सांगितली जाणार आहे. ही कथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता लेखक भावेश मंडलिया आणि गौरव शुक्ला यांनी लिहिली आहे. तर उमेश शुक्ला, सेजल शाह, आशिष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडलिया चित्रपटाचे निर्माते आहेत.

“माझ्यावर पुस्तक आणि चित्रपट तयार करण्यासाठी काही वर्षांपासून अनेकजण मागे लागले आहेत. यासाठी माझी बिलकूल इच्छा नव्हती. कारण माझ्यावर अनेक पीडित लोकांची मोठी जबाबदारी आहे. पण प्रतिभाशाली टीमसोबत भेट झाल्यावर मी या चित्रपटासाठी तयार झालो. मला विश्वास आहे की, माझी कथा व्यवस्थित या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली जाईल”, असं विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

“आम्ही नामवंत अशा व्यक्तीवर चित्रपट बनवण्यासाठी खूप उत्साहित आहे. सर्व हिरो टोपी घालत नाहीत. काही काळे कोटही घालतात. निकम हे एक खरे हिरो आहेत. ते भारतातील एक सुपरहिरो आहेत. ते सूड घेण्यावर नाही तर न्याय देण्यावर विश्वास ठेवतात”, असं दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी सांगितले.

उज्ज्वल निकम यांना दहशतवादी प्रकरणातील मास्टर समजले जाते. निकम जो खटला हातात घेतात त्यातला एकही आरोपी सुटत नाही, असं बोललं जाते. 26/11 दहशतवादी हल्ल्यात पकडलेल्या एकमेव दहशतवादी कसाबची केस त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. याशिवाय 1993 चा बॉम्ब ब्लास्ट, गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या यासारखे मोठे प्रकरणाचे खटले निकम यांनी चालवले आहेत.

उज्ज्वल यांनी जवळपास आपल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये 628 आरोपींना जन्मठेप आणि 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे. बऱ्याचदा निकम यांना अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांकडून धमकी मिळालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. अशी सुरक्षा मिळणारे निकम हे देशातील एकमेव वकील आहेत. लवकरच त्यांच्या बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात होईल.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.