AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावमध्ये हात-पाय बांधून डॉक्टर तरुणीवर बलात्कार; दुसऱ्यासोबत लग्न केल्यास ठार मारण्याची धमकी

जळगावमध्ये हात-पाय बांधून डॉक्टर तरुणीवर परिचारकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून संपत लक्ष्मण मल्हाड (मूळ रा. दरीबडची, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावमध्ये हात-पाय बांधून डॉक्टर तरुणीवर बलात्कार; दुसऱ्यासोबत लग्न केल्यास ठार मारण्याची धमकी
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 5:32 PM
Share

नाशिकः जळगावमध्ये हात-पाय बांधून डॉक्टर तरुणीवर परिचारकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून संपत लक्ष्मण मल्हाड (मूळ रा. दरीबडची, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनेनंतर आरोपी फरार आहे. (Doctor raped in Jalgaon; Threats to kill if married to another)

पीडित 28 वर्षीय तरुणी बीड जिल्ह्यातली आहे. ती पुण्यात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून नोकरी करते. ही तरुणी उस्मानाबाद येथील नर्सिंग कॉलेजवर नोकरीस होती. या काळात प्रशिक्षणासाठी म्हणून ती सांगलीला गेली. तिथे त्याची संपतशी ओळख झाली. संपत हा जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो. तेव्हा संपतने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे आमिष दाखवले आणि राज्यातल्या अनेक शहरात फिरायला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आपल्याला लग्न करायचे आहे. लग्नापूर्वी घर घ्यायचे आहे, असे म्हणत तो तरुणीकडून वारंवार पैसे उकळायचा. या दरम्यान तरुणी गर्भवती झाली. त्यावेळी ती पु्ण्यात होती. हे समजताच संपतने तिला लाडीगोडी लावून समजावले. जळगावला बोलावून घेतले व गर्भपात करायला भाग पाडले. मात्र, त्याने तरुणीच्या परस्पर मार्च 2020 मध्ये लग्न केले. हे तरुणीला समजले. त्यामुळे ती संपतला टाळू लागली.

बदनामाची धमकी देत अत्याचार

संपतच्या लग्नानंतर तरुणीने त्याला टाळणे सुरू केले. मात्र, त्याने तिला ब्लॅकमेलिंग करणे सुरू केले. आपले संबंध होते हे तुझ्या नातेवाईकांना, घरातील लोकांना सांगेन म्हणत तिच्याशी पुन्हा संपर्क वाढवला. त्याने तिला भेटण्यासाठी पुन्हा गळ घातली. सप्टेंबर 2020 मध्ये त्याने तरुणीला धमकावून औरंगाबादला बोलावून घेतले. तिथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. शिवाय तू दुसऱ्या कोणाशी लग्न केलेस तर ठार मारेन, अशी धमकी दिली.

क्रौर्याची परिसीमा गाठली

सप्टेंबर महिन्यातल्या 6 तारखेला संपतने डॉक्टर तरुणीला धमकावून जळगावला बोलावून घेतले. तिला आपल्या मैत्रिणीच्या रूमवर नेले. तिथेही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने विरोध केला. तेव्हा त्याने तिचे हात आणि पाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. शिवाय कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या वारंवारच्या अत्याचाराला आणि धमकीला कंटाळून तरुणीने एमयाडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार आरोपी संपतविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करत आहेत. (Doctor raped in Jalgaon; Threats to kill if married to another)

इतर बातम्याः

चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार; नाशिकजवळची औंढेवाडी हादरली, एक आरोपी अल्पवयीन

नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची फसवणूक; माजी संचालकाने घातला गंडा, गुन्हा दाखल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.