चोरलेल्या रिक्षातच गप्पांचा फड, डोंबिवलीत चोरट्यांना फिल्मी स्टाईल अटक

डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी चोरीच्या सात रिक्षा फिल्मी स्टाईलने हस्तगत केल्या आहेत. (Dombivali Police Arrest rickshaw theft) 

चोरलेल्या रिक्षातच गप्पांचा फड, डोंबिवलीत चोरट्यांना फिल्मी स्टाईल अटक

डोंबिवली : डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी चोरीच्या सात रिक्षा फिल्मी स्टाईलने हस्तगत केल्या आहेत. चोरट्यांनी चोरी केलेली रिक्षात गप्पा मारत असताना पोलिसांनी चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी या चोरांकडून या रिक्षा जप्त केल्या आहे. या चोरांनी अजून रिक्षा चोरी केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. (Dombivali Police Arrest rickshaw theft)

डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दीपक दाभाडे आपल्या पथकासह रात्री पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांची गाडी एका रस्त्याने जात असताना त्यांची नजर बाजूला असलेल्या एका रिक्षावर पडली. या रिक्षात दोन जण बसून गप्पा मारत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले असता, आम्ही फेरफटका मारायला निघालो आहे, असे सांगितले.

ही चर्चा सुरु असताना हे दोघे काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांना जाणवले. त्यानंतर पोलिसांनी ते ज्या रिक्षात बसले होते. त्या रिक्षाचा नंबर बघितला. त्यावेळी रिक्षाचा नंबर बघून पोलीस हैराण झाले. कारण 8 ऑक्टोबरला ही रिक्षा चोरीस गेली होती.

पोलिसांनी या प्रकरणी रिक्षात बसलेल्या दोघांना पोलीस ठाण्यात नेले. त्यांची चौकशी केली असता, या दोघांनी एका मित्राच्या मदतीने ती रिक्षा चोरी केली होती.

विशेष म्हणजे त्या दोघांनी एक दोन नाही तर सात रिक्षा आणि दोन दुचाकी चोरी केल्या आहेत. त्यानंतर रामनगर पोलिसांनी डोंबिवलीत राहणाऱ्या शंतून काळे, विशाल इंगोले आणि त्यांचा साथीदार किरण भोसले या त्रिकूटास अटक केली आहे. त्यांच्याकडून सात रिक्षा हस्तगत केल्या आहे.(Dombivali Police Arrest rickshaw theft)

संबंधित बातम्या : 

दुबईत नोकरीला असल्याचा बनाव, नागपुरातील मुलीशी लग्न, ऑस्ट्रेलियन नागरिकाकडून फसवणूक

…म्हणून दिवाळीपर्यंत कांदा जाणार शंभरीच्या पार; जाणून घ्या ‘कारण’

Published On - 4:15 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI