US Election 2020 : ‘विजेत्याची घोषणा करणं मतदारांचं काम’, निकालापूर्वीच बायडन-ट्रम्पमध्ये ट्विटर वॉर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

US Election 2020 : ‘विजेत्याची घोषणा करणं मतदारांचं काम', निकालापूर्वीच बायडन-ट्रम्पमध्ये ट्विटर वॉर

मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी (US President) कोण विराजमान होणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पिछाडीवर आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी (Joe Biden) मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, अंतिम निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच दोन्ही उमेदवारांमध्ये ट्विटर वॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Donald Trump and Joe Biden tweets before final result says they will win US Election 2020)

ट्रम्प आणि बायडन या दोन्ही उमेदवारांनी निकालापूर्वी आपणच निवडणूक जिंकू असा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, “मी रात्री एक निवेदन जारी करणार आहे, एक मोठा विजय”. ट्रम्प यांनी अजून एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आपण खूप पुढे आहोत, परंतु काही लोक मतमोजणीत गडबड करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण त्यांना असं करु द्यायचं नाही. एकदा मतदान झालं की ते पुन्हा होणार नाही”.

दुसऱ्या बाजूला बायडन यांनी त्यांच्या समर्थकांसाठी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “मित्रांनो विश्वास ठेवा, आपण हे जिंकणार आहोत. त्यानंतर बायडन यांनी लिहिलं आहे की, विजेत्याची घोषणा करणं माझं किंवा ट्रम्प यांचं काम नाही. ते काम मतदार करणार आहेत. आपण विजयाच्या दिशेने कूच केली आहे. सर्वांचे आभार!”

41 राज्यांमधील मतमोजणी पूर्ण

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अमेरिकेतील 50 राज्यांपैकी 41 राज्यांमधील मतमोजणी पूर्ण झाली आहे. तर फक्त 9 राज्यांमधील मतमोजणी बाकी आहे. पेंसिल्वेनिया आणि जॉर्जियामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर असल्याचं कळतंय. तर टेस्कास, साऊत कैरोलिना आणि ओक्लाहोमामध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. असं असलं तरी सध्या जो बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.

दरम्यान, उर्वरित 9 राज्यांचा निकाल हाती आल्यानंतरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपती डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विराजमान होणार?, की जो बायडन इतिहास घडवणार हे स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

US Election | ‘समोसा कॉकस’चा दबदबा; भारतीय वंशाच्या चौघांची हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजमध्ये फेरनिवड

Joe Biden | ट्रम्प यांच्याशी कडवी झुंज; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

विरोधकांकडून मतदान प्रक्रिया प्रभावित, ट्रम्प यांचा आरोप, ट्विटरकडून शिक्षा

US Election 2020 LIVE : दोन विशाल राज्य गमावूनही ट्रम्पना विजय शक्य, 2016 च्या रणनीतीची पुनरावृत्ती होणार?

US Election 2020 LIVE : जो बायडन बहुमताच्या दिशेने, ट्रम्प यांना 213 तर जो बायडन यांना 238 मतं

(Donald Trump and Joe Biden tweets before final result says they will win US Election 2020)

Published On - 2:39 pm, Wed, 4 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI