AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case | भारती-हर्षची आजची रात्रही तुरुंगातच जाण्याची शक्यता, जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडणार?

भारती आणि हर्ष यांच्या जामीन अर्जावर एनसीबी आपले उत्तर आज दाखल करणार असून, सुनावणीसाठी पुढील तारीख मागण्यात येणार असल्याचे कळते आहे.

Drugs Case | भारती-हर्षची आजची रात्रही तुरुंगातच जाण्याची शक्यता, जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडणार?
| Updated on: Nov 23, 2020 | 2:32 PM
Share

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील एका मोठ्या कारवाईत एनसीबीने प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना अटक केली आहे. आज (23 नोव्हेंबर) त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती (bail hearing latest update). मात्र, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. भारती आणि हर्ष यांच्या जामीन अर्जावर एनसीबी आपले उत्तर आज दाखल करणार असून, सुनावणीसाठी पुढील तारीख मागण्यात येणार असल्याचे कळते आहे (Drugs Case Bharti Singh and Harsh Limbachiyaa bail hearing latest update).

भारती आणि हर्ष यांच्या जामीन अर्जावर आज एनसीबी उत्तर दाखल करेल, असे सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले. तर, आज  ते इतर प्रकरणांमध्ये देखील व्यस्त असल्याने एनसीबीची बाजू मांडणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा वेळी ही सुनावणी पुढे ढकलून दुसरी तारीख देण्यात यावी, अशी मागणी ते करणार असल्याचे म्हटले आहे.

(Drugs Case Bharti Singh and Harsh Limbachiyaa bail hearing latest update).

एनसीबीची बाजू लक्षात घेऊन कोर्टाने सुनावणीची तारीख पुढे ढकलली तर आजची रात्रही भारती आणि हर्ष यांना तुरूंगात घालवावी लागणार आहे. आजची सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी एनसीबी करणार असल्याचे कळते आहे.

4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली होती. कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता (Drugs Case Bharti Singh and Harsh Limbachiyaa bail hearing latest update).

हर्षची तब्बल 17 तास चौकशी

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) आणि कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना थेट कोर्टात हजर केले गेले. शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. तर, तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयालाही अटक करण्यात आली.

हर्ष आणि भारती यांना NCB ने आधीच समन्स बजावले होते. नंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली होती (Drugs Case Bharti Singh and Harsh Limbachiyaa bail hearing latest update).

ड्रग्ज तस्कराने घेतले भारती-हर्षचे नाव

एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

(Drugs Case Bharti Singh and Harsh Limbachiyaa bail hearing latest update)

संबंधित बातम्या :

Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक

Harsh Limbachiyaa Arrest | कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक, NCB कडून तब्बल 17 तास चौकशी

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.