The Rock | ‘द रॉक’ ड्वेन जॉन्सनला कोरोनाची लागण, पत्नी आणि दोन मुलीही विळख्यात

The Rock | 'द रॉक' ड्वेन जॉन्सनला कोरोनाची लागण, पत्नी आणि दोन मुलीही विळख्यात

न्यूयॉर्क : ‘द रॉक’ या नावाने प्रसिद्ध असलेला ‘WWE’ स्टार अर्थात अभिनेता ड्वेन जॉन्सन याला कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्याबाबत शिस्तबद्ध असूनही मी, माझी पत्नी आणि दोन मुलींना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती ड्वेनने इन्स्टाग्रामवर दिली. (Dwayne “The Rock” Johnson and his family tested positive for the coronavirus)

ड्वेन जॉन्सन हा सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. 48 वर्षीय ड्वेन, त्याची 35 वर्षीय पत्नी लॉरेन आणि त्यांच्या मुली जास्मीन (वय वर्षे चार) आणि टियाना (वय वर्षे दोन) यांना सुमारे अडीच आठवड्यांपूर्वी विषाणूचा संसर्ग झाला.

“अगदी जवळच्या कौटुंबिक मित्रां”कडून आम्हाला संसर्ग झाला, असा अंदाज रॉकने वर्तवला आहे, मात्र तो कधी आणि कसा झाला, याची काहीच कल्पना नसल्याचे त्याने सांगितले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचेही तो म्हणाला.

“मी तुम्हाला सांगू शकतो, की कुटुंब म्हणून आमच्यासाठी ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक परिस्थिती होती” असे जॉन्सनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले.

“कोव्हिड संसर्ग होणे ही गंभीर जखमा बऱ्या होणे किंवा संपत्तीतून बेदखल केले जाणे, किंवा कफल्लक होण्यापेक्षा खूप वेगळी गोष्ट आहे, म्हणजे इतर गोष्टी मी बरेच वेळा अनुभवल्या आहेत. पण माझ्या कुटुंबाचे संरक्षण करणे, यालाच माझे प्रथम क्रमांकाचे प्राधान्य असते” असेही ड्वेनने भावूक होत सांगितले.

“आम्ही सर्वांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद गोळा करत आहोत, कारण आम्हाला चांगलेच ठाऊक आहे की कोविड संसर्ग होऊन गेल्यानंतरही तुम्ही नेहमीच बळकट आणि आरोग्यदायी असाल, असे नाही” असे तो प्रांजळपणे म्हणाला.

ड्वेन जॉन्सनने आपले वडील रॉकी याच्या पावलावर पाऊल ठेवत व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून नाव कमावले आणि तो ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ स्टार झाला. त्याचे जगभरात चाहते आहेत.

‘डब्ल्यूडब्ल्यूई’ला रामराम ठोकल्यानंतर त्याने ‘द स्कॉर्पियन किंग’, ‘फास्ट अँड फ्यूरियस 6’ आणि जुमान्जी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. (Dwayne “The Rock” Johnson and his family tested positive for the coronavirus)

(Dwayne “The Rock” Johnson and his family tested positive for the coronavirus)

Published On - 2:00 pm, Thu, 3 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI