AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराणेशाहीवाले पक्ष लोकशाहीसाठी सर्वाधिक धोकादायक; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

बिहारमध्ये झालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयातून देशवासीयांना संबोधित केलं आहे. त्यावेळी ते बोलत होते.

घराणेशाहीवाले पक्ष लोकशाहीसाठी सर्वाधिक धोकादायक; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
| Updated on: Nov 11, 2020 | 9:03 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात सर्वत्र अनेक पक्ष आहेत, जिथे घराणेशाही चालते, अनेक ठिकाणी काही ठराविक कुटुंबांचे पक्ष आहेत. अशा घराणेशाहीवाल्या पक्षांचं एक मोठं जाळं देशभर सर्वत्र दिसून येत आहे. ही बाब लोकशाहीसाठी खूप घातक असल्याचे मत मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नाव न घेता काँग्रेस पक्षाला लक्ष्य केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Election 2020) भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयातून देशवासीयांना संबोधित केलं आहे, यावेळी ते बोलत होते. (Dynastic political parties are the most dangerous for democracy; Narendra Modi attacks on Congress)

नरेंद्र मोदी म्हणाले की, काश्मीरपासून-कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र अनेक पक्ष आहेत, जिथे घराणेशाही चालते, काही ठराविक कुटुंबांचे पक्ष आहेत. अनेक फॅमिली पार्ट्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा घराणेशाहीवाल्या पक्षांचं एक मोठं जाळं देशभर सर्वत्र दिसून येत आहे. ही बाब लोकशाहीसाठी खूप घातक आहे. परंतु इथल्या युवकांना ही गोष्ट चांगलीच माहीत आहे.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, देशातील एक मोठा राष्ट्रीय पक्ष घराणेशाहीत अडकला आहे. या पक्षाने अनेक दशकं देशात सत्ता गाजवली आहे. परंतु आता तो पक्ष केवळ एका कुटुंबाच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आणखी वाढली आहे. आमच्या पक्षाला लोकशाहीचं जिवंत उदाहरण बनवायचं आहे. त्यामुळेच देशाचा पंतप्रधान भर सभेत ‘नड्डाजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ असा नारा देऊ शकतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचा विकास, राज्यांचा विकास हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि विकासाचा हाच मुद्दा येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. हे बिहारच्या निवडणुकीतूनही सिद्ध झालं आहे, असं सांगतानाच या लोकांना हा मुद्दा लक्षात येत नाहीये, म्हणूनच त्यांची वारंवार जमानत जप्त होत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता केली.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपनेही दणदणीत यश मिळविलं असून आज हजारो भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयासमोर जमून दणक्यात सेलिब्रेशन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. देशाच्या राजकारणाचा मुख्य आधार हा विकास हाच आहे. बँक खाते, गॅस कनेक्शन, घर, चांगले रस्ते, रेल्वे स्टेशन, विमानतळ, शाळा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. देशाचा विकास, राज्यांचा विकास हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि विकासाचा हाच मुद्दा येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. हे बिहारच्या निवडणुकीतूनही सिद्ध झालं आहे, असं सांगातानाच या लोकांना हा मुद्दा लक्षात येत नाहीये, म्हणूनच त्यांची वारंवार जमानत जप्त होत आहे, असं मोदी म्हणाले. एनडीएवर जनता जो स्नेह दाखवला त्याचं कारण विकास आहे. देशाला पुढे नेण्यासाठी काम करत राहणार, असा मी विश्वास देतो, असंही ते म्हणाले.

भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्यात गरिब, पीडित, दलित, शोषित, वंचित आपलं भविष्य बघतात. देशातील प्रत्येक घटकाचा विचार भाजप केला जातो. त्यामुळेच जनतेचा भाजपवर विश्वास वाढला आहे. भाजपवर जनतेचा आशीर्वाद आणि स्नेह निरंतर वाढत चालला आहे, असं सांगतानाच बिहारमध्ये पक्षाने अगोदरपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे. गुजरातमध्ये भाजप 90 व्या दशकापासून आहे. मध्यप्रदेशातही भाजप सत्तेत आहे. देशातील नागरिक भाजपवर सर्वाधिक विश्वास ठेवत आहेत, असं ते म्हणाले.

काल जे निकाल आले त्याचा अर्थ खूप खोल आहे. त्याचे उद्दीष्टे खूप मोठे आहे. लोकसभा निवडणुकीत जे निकाल आले होते, त्याचे कालचे निकाल हे विस्तार आहेत. भाजप पूर्वेत जिंकला. भाजपला गुजरात, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकात विजय मिळाला. दोन केंद्रशासित प्रदेशातही निवडणूक झाली. लड्डाख, दिव-दमनमध्ये भाजचा विजय झाला. देशाच्या प्रत्येक नागरिकाने भाजपला वाढवला आहे, याकडेही त्यांनी देशावासियांचे लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

Prime Minister Narendra Modi : भाजपकडे सायलंट व्होटर; तोच भाजपला निरंतर मतदान करतोय : नरेंद्र मोदी

विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच ‘त्यांचं’ डिपॉझिट जप्त; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात

(Dynastic political parties are the most dangerous for democracy; Narendra Modi attacks on Congress)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.