AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ हॅकरचा आणि आमचा संबंध नाही, ईव्हीएम तयार करणाऱ्या कंपनीचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आली होती, असा दावा करणाऱ्या सायबर एक्स्पर्टबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीसाठीचे ईव्हीएम तयार करणाऱ्या टीममध्ये माझा समावेश होता म्हणणारा हा सायबर एक्स्पर्ट आणि ईव्हीएम तयार करणाऱ्या कंपनीचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण ईलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने Electronic Corporation of India (ECIL) दिलंय. सईज […]

'त्या' हॅकरचा आणि आमचा संबंध नाही, ईव्हीएम तयार करणाऱ्या कंपनीचं स्पष्टीकरण
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आली होती, असा दावा करणाऱ्या सायबर एक्स्पर्टबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकीसाठीचे ईव्हीएम तयार करणाऱ्या टीममध्ये माझा समावेश होता म्हणणारा हा सायबर एक्स्पर्ट आणि ईव्हीएम तयार करणाऱ्या कंपनीचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण ईलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने Electronic Corporation of India (ECIL) दिलंय.

सईज शुजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे. त्याने सध्या अमेरिकेला राजकीय आश्रय मागितला आहे. लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याने अत्यंत खळबळजनक आरोप केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते आणि मातब्बर वकील कपिल सिब्बलही उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर भाजपने काँग्रेसवर देशाविरोधात षडयंत्र रचल्याची टीका केली आहे.

काय आहे ईसीआयएलचं स्पष्टीकरण?

ईसीआयएल या कंपनीकडे ईव्हीएम बनवण्याची जबाबदारी होती. हैदराबादचा सईद शुजा या कंपनीचा सायबर एक्स्पर्ट होता आणि ईव्हीएम डिझाईन बनवण्यात त्याचा वाटा होता, असा दावा करण्यात आला. यामुळेच जास्त संशय निर्माण झाला. यानंतर ईसीआयएलने रेकॉर्ड तपासले. या रेकॉर्डनुसार, 2009 ते 2014 या काळात तयार करण्यात आलेल्या ईव्हीएम बनवण्याच्या प्रक्रियेत फक्त सईद शुजाच नाही, तर त्याच्या टीममधील एकाचाही कंपनीशी कधी संबंध नव्हता, असं स्पष्टीकरण ईसीआयएलने दिलंय.

ईसीआयएल ही सरकारी कंपनी आहे. ईसीआयएल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन्ही सरकारी कंपन्यांकडे ईव्हीएम बनवण्याची जबाबदारी असते. यापैकी ईसीआयएलचा आपण कर्मचारी असल्याचं या सायबर एक्स्पर्टने सांगितलं. विशेष म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या शुजाने तोंडाला मास्क लावला होता.

निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

“भारतात ईव्हीएमशी छेडछाड केली जाते, असा दावा लंडनमधील एका कार्यक्रमात करण्यात आलाय याची भारतीय निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. पक्षीय भावनेने प्रेरित अशा दाव्यांबाबत आयोग सावधान आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएमची विश्वसनियता दृढ करण्यासाठी आयोग सक्षम आहे. भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने विविध पातळीवर पडताळणी करुन ईव्हीएमची निर्मिती केली जाते. 2010 पासूनच प्रसिद्ध तज्ञांच्या देखरेखीखाली ही पडताळणी होते. याबाबतीत काय कारवाई केली जाऊ शकते याची माहिती घेतली जात आहे,” असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलंय.

काय आहेत हॅकरचे दावे?

-रिलायन्स जिओने लो फ्रिक्वेन्सी सिग्नल देऊन ईव्हीएम टॅम्पर करण्यात मदत केली. जिओच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत माहित नाही. भारतात नऊ ठिकाणी हे काम केलं जातं.

-आमच्या टीमने हस्तक्षेप केला नसता तर भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही विजय मिळवला असता.

-भारतातील एका मोठ्या पत्रकाराला ईव्हीएमची स्टोरी सांगितलेली आहे. हा पत्रकार दररोज रात्रीच्या शोमध्ये ओरडत असतो.

-दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही हॅकिंग होऊ दिली नाही. अन्यथा हे राज्यही भाजपने जिंकलं असतं.

-भाजपशिवाय सपा, बसपा आणि आपनेही ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं का याबाबत विचारणा केली.

-2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलंय हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंना माहित होतं. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी तंझिल अहमद हे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी करत होते आणि हत्येचा गुन्हा दाखल करणार होते. पण या अधिकाऱ्याचीही हत्या करण्यात आली.

संबंधित बातम्या 

‘रॉ’ म्हणजे नेमकं काय?

EVM हॅकिंगच्या माहितीमुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन एक्स्पर्टचा दावा

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी : भुजबळ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.