AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी, साखर कारखान्याच्या व्यवहारात घोटाळ्याचा संशय

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्ज दिली होती.

Mumbai : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी, साखर कारखान्याच्या व्यवहारात घोटाळ्याचा संशय
प्राजक्त तनपुरे
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 8:14 PM
Share

मुंबई : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने चौकशी केल्यामुळे पुन्हा चर्चांना उधण आलं आहे. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, अर्जुन खोतकर, अशा अनेक नेत्यांमागे सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू आहे. त्यात आता प्राजक्त तनपुरेंचीही भर पडली आहे. त्यामुळे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र कॉ-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेने काही कारख्यान्यांना कर्ज दिली होती. त्यात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने अहमदनगर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज प्रकरणात जप्त केला होता. या कारखान्याचा नंतर 2012 सालात लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी होती मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनी ने 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता. या सर्व व्यवहारावर ईडीला संशय आहे.  या अनुषणगाने ईडी चौकशी करत आहे. आज प्राजक्त तनपुरे यांना समन्स देऊन बोलावण्यात आपलं होतं. त्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले आहेत.

तिसरा कारखाना संशयाच्या भोवऱ्यात

याआधीही आपण जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीवरून वाद झाल्याचं, राजकीय टीका झाल्याचं पाहिलं आहे. त्यानंतर अर्जुन खोतकरांच्या कारखान्याची चौकशी आणि आता या तिसऱ्या साखर कारखान्याचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्राजक्त तनपुरेंकडून याबाबत अजून कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही, हे नेमकं प्रकरण काय आहे? हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.

Nanded Crime | पत्नीवर संशय घ्यायचा, नंतर शांत डोक्याने घडवलं हत्याकांड; पत्नी, मुलाला संपून घेतला गळफास

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी होणार, केंद्रीय नगरविकास मंत्र्यांचे आदेश

चांगला क्रेडिट स्कोअरही आता कर्जाची हमी ठरणार नाही, रेटिंग सुधारण्यासाठी ही महत्त्वाची पावले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.