AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएचआर बँक घोटाळ्याची व्याप्ती अकराशे कोटींची, बड्या मंडळींनी मालमत्ता विकत घेतल्या, एकनाथ खडसेंचा आरोप

बीएचआर प्रकरणी दिल्लीहून चौकशीचे दिलेले निर्देश सुध्दा पाळण्यात आले नसल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला. (BHR Bank Scam)

बीएचआर बँक घोटाळ्याची व्याप्ती अकराशे कोटींची, बड्या मंडळींनी मालमत्ता विकत घेतल्या, एकनाथ खडसेंचा आरोप
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 30, 2020 | 7:02 PM
Share

जळगाव: भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील घोटाळ्याची व्याप्ती ही तब्बल ११०० कोटी रूपयांची असून यात बड्या मंडळींनी मातीमोल भावात बँकेच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. पोलीस तपासात त्यांची नावं समोर येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. खडसेंनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे प्रकरण पध्दतशीरपणे दडपून टाकण्यात आले, असा आरोप केला आहे. अगदी दिल्लीहून चौकशीचे दिलेले निर्देश सुध्दा पाळण्यात आले नसल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला आहे. (Eknath Khadse press on BHR Bank Scam)

बीएचआर सहकारी बँकेतील घोळ उघडकीस आल्यानंतर २०१७ साली आपण तक्रार केली होती. याप्रसंगी तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी या प्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्याचे सुचविले. यानुसार रक्षाताई खडसे यांच्यासह राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार केली. यानुसार राधामोहन सिंग यांनी सांगितल्यानंतर संबंधित खात्याकडे तक्रार केली. मात्र, यापुढे चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप, एकनाथ खडसेंनी केला. अ‍ॅड. किर्ती पाटील यांच्या माध्यमातून याप्रकरणी पाठपुरावा करत असल्याची माहिती खडसे यांनी दिली.

एकनाथ खडसे यांनी प्रशासक जितेंद्र कंडारे यांना भेटलो. यानंतर माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. यात अकराशे कोटी रूपयांच्या मालमत्ता मातीमोल भावात घेतल्याचे दिसून येत आहे. यात डिपॉजिटच्या रिसीट या ३०-४० टक्के दलालांच्या माध्यमातून घेण्यात येत होत्या. यात अनेक मोठ्या मंडळींनी मालमत्ता घेतल्याची माहिती असून याबाबतचे विवरण हे पोलीस तपासातून समोर येणार आहे, असा दावा एकनाथ खडसेंनी केला. हे प्रकरण खूप मोठे असून जवळपास दोन ट्रक इतकी सामग्री जप्त करण्यात आली असून यातून दोषींची अचूक माहिती मिळण्यासाठी तपास हा वेगाने केला तरी जवळपास एक-दोन महिने लागू शकतात, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.(Eknath Khadse press on BHR Bank Scam)

राधामोहन सिंग यांची भेट

राधामोहन सिंग हे केंद्रीय सहकार मंत्री असतांना त्यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. मात्र, ही चौकशी करण्यात आलेली नाही. पोलिसांवर राजकीय दडपण असल्याने ही चौकशी वरवर करण्यात आली. यात दिल्ली येथे सुरू असणारी चौकशी सुध्दा दडपण्यात आली. २०१८ पासून चौकशीचे निर्देश दडपण्यात आले असले तरी आता मात्र याचा गौप्यस्फोट झाला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना भेटलो असता त्यांनी त्यांच्यावर दडपण असल्याचे नमूद केल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला. या प्रकरणात जळगाव, जामनेर, पुणे आदींसह अन्य शहरांमधील मालमत्ता या कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.(Eknath Khadse press on BHR Bank Scam)

जोपर्यंत ठेवीदारांचा पैसा मिळणार नाही तोवर आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. सरकारने कोणत्याही दडपणाला बळी न पडता सत्य समोर आणावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच सुनील झंवर यांच्याकडे नेत्यांचे लेटरपॅड कसे आले ? वॉटरग्रेसची कागदपत्रे तेथे कशी आली ? तेथून पगार कसे दिले जात होते ? याचा महापालिका व जिल्हा परिषदेशी संबंध कसा आहे, याची माहिती तपासात समोर येईल असे ते म्हणाले. या प्रकरणी आम्ही प्रक्रियेनुसार तक्रारी करून पाठपुरावा केला तरी यावर अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मात्र, सध्या सुरू असणार्‍या कारवाईमुळे ठेवीदारांना न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse press on BHR Bank Scam)

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंनी राज्यपालांना पाठवले पुस्तक, भगतसिंह कोश्यारी म्हणाले….

एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

Eknath Khadse | ‘प्रसाद लाडांनी एकदा तरी जनतेतून निवडणून या’, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

(Eknath Khadse press on BHR Bank Scam)

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली….

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?