AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाचा फटका; जिल्ह्यात अकराशे जनावरे दगावल्याचा अंदाज; पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पावसाने केलेला कहर व थंडीच्या कडाक्याचा मोठा फटका जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या हंगामाला बसला आहे. द्राक्षांच्या बांगासोबतच , हाताला आलेली कांद्याची रोप भुईसपाट झाली आहेत. गहू, हरभरा व अन्य कडधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर हरभऱ्याच्या पिकावर बुरशी जन्य आजार निर्माण झाले आहेत.

अवकाळी पावसाचा फटका; जिल्ह्यात अकराशे जनावरे दगावल्याचा अंदाज; पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Rain update
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 03, 2021 | 2:25 PM
Share

पुणे – जिल्ह्यात सर्वत्र पडलेला अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालासह पाळीव जनावरांना बसला आहे. मागील दोन दिवसात पडलेली कडाक्याची थंडी , धुकं यामुळं जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 135 शेळ्या – मेंढ्यांचा दगावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कुरणांमध्ये चराईसाठी शेळ्या मेंढ्या घेऊन बाहेर पडलेल्या भटक्या मेंढपाळांना याचा मोठा फटका बसला आहे. अचानकपणे वाढलेली थंडी, धुकं व त्यात पाऊस यामुळ मेंढ्यांचा थंडीने जीव घेतला आहे. या घटनेने अनेक शेतकरी, मेंढपाळही हवाल दिल झाले आहेत.

शेतकरीही अस्वस्थ पावसाने केलेला कहर व थंडीच्या कडाक्याचा मोठा फटका जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या हंगामाला बसला आहे. द्राक्षांच्या बांगासोबतच , हाताला आलेली कांद्याची रोप भुईसपाट झाली आहेत. गहू, हरभरा व अन्य कडधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर हरभऱ्याच्या पिकावर बुरशी जन्य आजार निर्माण झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी तसेच शेळया- मेंढ्या पाळणाऱ्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

दगावलेल्या शेळ्या मेंढ्यांची संख्या सर्वसाधारणपणे आंबेगाव तालुक्यात 10 शेळ्या , 169 मेंढ्या, शिरुरमध्ये 5 शेळ्या109 मेंढ्या , खेडमध्ये 4 शेळ्या73 मेंढ्या , जुन्नर शेळया 15 मेंढ्या 541 , हवेलीमध्ये शेळ्या 2,  मेंढ्या 17, भोर शेळी 1 मेंढया 2, मावळ शेळ्या 2 , मेंढ्या 36, बारामती शेळ्या 6 मेंढ्या 40, दौंड शेळ्या 3 , मेंढया 24, पुरंदर शेळ्या7 ,मेंढ्या 119

MTHL: मुंबई-नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचे काम 60 टक्के पूर्ण

पाटणाच्या PNB मध्ये पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उघडले होते खाते, 323 रुपये अजूनही जमा

अंबरनाथमध्ये 7 वर्षांची ‘फॉरेन रिटर्न’ मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन तपासणी होणार

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ