AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शूटआऊट अॅट लोखंडवाला फेम भानुप्रताप बर्गे विधानसभा लढवणार?

भानुप्रताप बर्गे पुण्यात एसीपी म्हणून निवृत्त झाले आहेत. यानंतर ते (Bhanupratap Barge) आता राजकारणात सक्रिय होत आहेत. ते शिवाजीनगर किंवा कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. त्यांचा पक्ष अजून ठरलेला नाही. मात्र अनेक पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत.

शूटआऊट अॅट लोखंडवाला फेम भानुप्रताप बर्गे विधानसभा लढवणार?
| Edited By: | Updated on: Aug 01, 2019 | 8:42 PM
Share

पुणे : निवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय. आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट भानुप्रताप बार्गेही (Bhanupratap Barge) लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. भानुप्रताप बर्गे पुण्यात एसीपी म्हणून निवृत्त झाले आहेत. यानंतर ते (Bhanupratap Barge) आता राजकारणात सक्रिय होत आहेत. ते शिवाजीनगर किंवा कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. त्यांचा पक्ष अजून ठरलेला नाही. मात्र अनेक पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत.

भानुप्रताप बर्गे हे नाव गुन्हेगारांना चांगलंच परिचित आहे. निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी बर्गे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. बर्गेंच्या निवृत्तीपूर्वी पुणे शहरात शुभेच्छांचे पोस्टर्स लागले होते. त्यानंतर या चर्चांनी अधिकच वेग पकडल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा तगडा जनसंपर्क, गुन्हेगारीवर घातलेला आळा यामुळे सर्व राजकीय पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत. लोकही त्यांच्या पाठीशी राहतील, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

भानुप्रताप बर्गे यांचा परिचय

भानुप्रताप बर्गे हे नाव पोलीस दलात प्रसिद्ध आहे. 19 पेक्षा जास्त एन्काऊंटर त्यांच्या नावार आहेत. तर 400 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महाराष्ट्र एटीएसमध्ये भानुप्रताप बर्गे यांचं नाव आदराने घेतलं जातं. मूळ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील असलेले बर्गे यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. एमबीएला प्रवेश घेतला आणि एमपीएससीचीही तयारी सुरु होती. याच काळात त्यांची पीएसआय म्हणून निवड झाली.

‘खासरे’च्या ब्लॉगनुसार, बर्गे यांची पहिलीच पोस्टिंग मुंबईतील डोंगरीमध्ये झाली. 96 टक्के मुस्लीमबहुल भाग असलेल्या डोंगरीमध्ये कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम, छोटा राजन, करीम लाला, युसूफ पटेल आणि हाजी मस्तान यांचा नेहमी वावर असायचे. 24 उपलब्ध असे अधिकारी म्हणून बर्गे यांची ओळख होती. बर्गे यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. महाराष्ट्र एटीएसमध्येही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या.

बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणूनही काम

खासरे‘च्या ब्लॉगनुसार, भानुप्रताप बर्गे हे Survivals Club Membership हा दहशतवाद विरोधी कार्यामुळे मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय पोलीस अधिकारी आहेत. भानूप्रताप यांना ऑगस्ट 2009 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भानुप्रताप बर्गे यांनी धीरूभाई अंबानी आणि तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची नात यांचे अपहरण करण्याचा कट रचलेल्या चार खलिस्तानी अतिरेक्यांना अटक केली. भानुप्रताप बर्गे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन आणि नसली वाडिया यांचे बॉडीगार्ड म्हणून सुद्धा काम केलंय.

शूटआऊट अॅट लोखंडवाला

बर्गे हे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील एक नवा अध्याय ठरलेल्या शूटआऊट अॅट लोखंडवाला चकमकीचेही साक्षीदार आहेत. 1991 मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या चकमकीत माया डोळस आणि दिलीप बुवा या गुंडासह सात जणांचा पोलिसांनी खात्मा केला होता. या पथकामध्ये भानुप्रताप बर्गे यांचाही समावेश होता.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.